निवडणुकांचे आलंय अमाप पीक

Started by Atul Kaviraje, January 14, 2023, 05:54:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,     

     आजकाल आपण पाहतोय, राजकारण एका वेगळ्याच मार्गाने प्रवास करतय. निवडणुकांचे तर अफाट, बेफाम, अगणित  पीक आलय. देशाच्या प्रत्येक गल्ली-बोळातून, कानI-कोपऱ्यातून कुणी ना कुणीतरी उमेदवार म्हणून तिकीट घेऊन उभा राहतो. कधी हरतो, पडतो, चक्क तोंडघशी पडतो, परंतु जिद्द पहा त्याची. पुन्हा जोमात, जोरात उभा राहतो, आणि यावेळी तर तो चक्क निवडूनही येतो. अश्या बऱ्याच घडामोडी आपण हल्लीच्या राजकारणात पाहत आहोत. माझं म्हणणं काहीही नाही. कुणीही जिंकून या, कुणीही सत्तेवर या, पण त्या खुर्चीला मात्र जागा. देशाचे भले, हित करा. जनतेच्या असंख्य प्रश्नांना उत्तरे द्या. त्यांची आजवर अडलेली कामे करा. त्यांचे आशीर्वाद तुम्हा नक्कीच मिळतील. यापूर्वीही निवडणूक व्हायच्या, जिंकून यायचे. कुणी मंत्री, कुणी खासदार, कुणी आमदार तर कुणी सत्ताधीश व्हायचे. पण त्यांचे आचरण नियम-बाह्य असायचे. याचा त्रास अंती सर्व-सामान्य मनुष्याला , जनतेला भोगायला लागायचा. नव्हे तो तर अजूनही, आजही भोगावा लागतोय. म्हणून आजच्या  उमेदवाराने हे निवडणुकीचे शेतीचे आधुनिक तंत्र अवलंबून जर सर्वार्थाने, प्रामाणिकपणे स्वतःला झोकून दिल तर, खरंच त्याचे भविष्य, त्याच्या पुढील आयुष्याचे पीक खरोखरच भरभरून येईल, बहरून येईल. त्याला काहीच कमी पडणार नाही. फक्त त्याची निःस्वार्थ सेवा मात्र हवी. ऐकूया, या विषयावर एक वास्तव-वादी राजकारणी-व्यंगात्मक-विनोदी कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "निवडणुकांचे आलंय अमाप पीक"

                             "निवडणुकांचे आलंय अमाप पीक"
                            -------------------------------

निवडणुकांचे आलंय अमाप पीक
गल्लोगल्ली शेते बहरलीत मोठी-बारीक
उमेदवारा गतकाळातून काहीतरी शिक,
शेतीचे तंत्र अवलंब तू आधुनिक.

     यापूर्वीही आले होते पीक
     यापुढेही येईल बहरून पीक
     त्यांनी खाल्ले, तू खाऊ नकोस,
     संपल्यावर नाहीतर मागावी लागेल भीक.

जो निवडून आला, खात सुटला
जनतेस आश्वासने देत राहिला
तेव्हा पाच वर्षांनी व्हायच्या,
नीट वागलास तर होईल ठीक.

     देशाचे भले करायचेय तुला
     देशाला पुढे न्यायचेय तुला
     अरे होऊ नकोस मिंधा,
     राजकारणाच्या धंद्यातून घे तू सीख.

जनता आहेच तुझ्या पाठीशी
फक्त आश्वासने देणे बंद कर
कार्य नको, ऐकून तरी घे त्यांचे,
आशिष त्यांचे लाभतील अधिक.

     आजवर उभे राहिले, निवडूनही आले
     पण पिकात त्यांच्या काटेच अधिक निघाले
     स्वतःही खाता खाता देशालाही विकले,
     अश्याना दे बिनधास्त तू किक.

आज गरज आहे तुझी
आज गरज आहे तुझ्या प्रामाणिकपणाची
सर्वार्थाने निःस्वार्थ कर्म कर,
जनतेच्या मनाला तू जिंक.

     निवडणुका येतील, निवडणुका होतील
     ठाम रहा तू आपल्या वचनास 
     अग्रेसर हो नेकीच्या मार्गावर,
     फोफावेल तुझेच अधिक, अमाप पीक.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2023-शनिवार.
=========================================