II शुभ मकर संक्रात II-शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, January 15, 2023, 10:57:22 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II शुभ मकर संक्रात II
                                  ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०१.२०२३ आहे. आजचा शुभ दिवस "मकर-संक्रांति" चा पुण्य-पर्व घेऊन आला आहे. सूर्यनारायणाचे याच दिनी मकर राशीत संक्रमण होत असते. देशभरात हा सण विभिन्न नावाने साजरा केला जातो. या दिवशी तिळाच्या आणि गुळाच्या पदार्थांना विशेष महत्त्व असते. चला तर या, सर्वांनी मिळून "तिळगुळ  घ्या  गोड  गोड  बोला" म्हणूया. आपली सारी भांडणे, हेवे-दावे मिटवून एक होऊया, एक राहूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींनI मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ऐकुया तर मकर संक्रांतीच्या काही गोड शुभेच्छा, ज्यांचा स्वाद आपल्या जिभेवर वर्षभर घोळत राहील.

     गूळाच्या गोडव्याप्रमाणे शुभेच्छांचा म्हणजेच मकर संक्राति शुभेच्छा मराठी (Makar Sankranti Shubhechha In Marathi) गोडवा ही आपल्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत शेअर करा. पाहा खास संक्रांत शुभेच्छा संदेश.

     मग तुम्हीही या उत्तरायणाचा सोहळा नक्की साजरा करा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने एकमेकांना आवर्जून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा, मकर संक्रांतीचे संदेश, कोट्स आणि मकर संक्रांत स्टेटस सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

1. पतंगाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळत राहो. अर्थात यशाच्या शिखरावर जाताना  तुम्ही पतंगाप्रमाणे उंच उंच जावो हीच सदिच्छा...उत्तरायणाच्या शुभेच्छा
2. येणारी मकर संक्रांत ही तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतेही संकट न येता भरभरून यश घेऊ येवो ही सदिच्छा. तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
3. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...उत्तरायणाच्या शुभेच्छा
4. तुमचे आयुष्य यावेळी सूर्याच्या किरणांप्रमाणेच सुखाने आणि भरभराटीने भरून जावो. मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात  आनंद घेऊन येवो
5. सुख, समृद्धी आणि समाधानाने तुमचे आयुष्य उजळून निघो हीच इच्छा
6. तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट न येवो हीच प्रार्थना. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
7. हा सूर्योदय तुमच्या आयुष्यात आशेची किरणे घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.  तुम्हाला कोणत्याही संकटांचा सामना न करावा लागो
8. मकर संक्रांतीच्या शुभ दिनी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा
9. या संक्रांतीच्या दिवशी तुमच्या आयुष्यात उगवता सूर्य हा आशेची किरणं घेऊन येवो, गगनात आनंद मावणार नाही अशा स्वरूपात तुमच्या आयुष्याचा पतंग उडो हीच सदिच्छा
10. ही संक्रांत तुमच्या आयुष्यात आशा, आनंद आणि सुख घेऊन येवो.  मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.पॉप xo.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.01.2023-रविवार.
=========================================