II शुभ मकर संक्रात II-शुभेच्छा-4

Started by Atul Kaviraje, January 15, 2023, 11:01:35 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II शुभ मकर संक्रात II
                                  ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०१.२०२३ आहे. आजचा शुभ दिवस "मकर-संक्रांति" चा पुण्य-पर्व घेऊन आला आहे. सूर्यनारायणाचे याच दिनी मकर राशीत संक्रमण होत असते. देशभरात हा सण विभिन्न नावाने साजरा केला जातो. या दिवशी तिळाच्या आणि गुळाच्या पदार्थांना विशेष महत्त्व असते. चला तर या, सर्वांनी मिळून "तिळगुळ  घ्या  गोड  गोड  बोला" म्हणूया. आपली सारी भांडणे, हेवे-दावे मिटवून एक होऊया, एक राहूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींनI मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ऐकुया तर मकर संक्रांतीच्या काही गोड शुभेच्छा, ज्यांचा स्वाद आपल्या जिभेवर वर्षभर घोळत राहील.

     एकमेंकाना मनाने जवळ आणणारा सण म्हणजे मकर संक्रांत. नवववर्षातील या पहिल्या सणाला आवर्जून मकर संक्रांती शुभेच्छा संदेश (Makar Sankranti Messages In Marathi) पाठवा.

11. गूळ आणि तीळाचा गोडवा, आकाशात उडणारे उंच उंच पतंग, या मकर संक्रांतीला तुमच्या जीवनात येवो आनंदाचे तरंग... हॅपी मकर संक्रांत
12. आभाळात पतंग दिसू लागल्यावर मन झालं उडू उडू, कडू आठवणी विसरून तिळाचा गोडवा जवळ करू, मकर संक्रांती शुभेच्छा.
13. सजवा थाळी दाखवा नैवेद्य..आला सण मकरसंक्रांतीचा.
14. S- शुभारंभ, A- आनंद, N- नवीन सुरूवात, K- कीर्ती, R- रोशनी, A- आत्मियता, N- नवी उमेद, T- तृप्ती, I- ईश्वरीय अनुभव...Happy Makar Sankranti 2022 शुभेच्छा
15. आनंदाचा आला बहर, पतंगाची सुरू झाली चढाओढ, तिळाचा आला गोडवा, तोच संक्रांतीचा सण आहे ओळखावा.
16. रांगोळीने सजू दे अंगण, तिळाचा सुटू दे घमघमाट, सुवासिनी येता घरी, द्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा खास
17. छोट्यांचे बोरन्हाण, मोठ्यांची पतंगबाजी आणि सुवासिनींचे हळदीकुंकू, सर्व घेऊन आला मकरसंक्रांतीचा उत्साह, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
18. थंडीच्या कडाक्यात उठा, आंघोळ करा, मस्तपैकी गरमागरम गूळपोळी खाऊन, पतंगबाजीचा आनंद लुटा, मकर संक्रांती 2022 च्या शुभेच्छा.

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.पॉप xo.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.01.2023-रविवार.
=========================================