प्रेम-गीत-आज तुला पाहिलंय मी, आज तुझाच झालोय मी

Started by Atul Kaviraje, January 15, 2023, 11:16:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक प्रेम-गीत ऐकवितो. "तू मेरी जिंदगी है, तू मेरी हर ख़ुशी है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही निशा-रविवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (तू मेरी जिंदगी है, तू मेरी हर ख़ुशी है)
--------------------------------------------------

                     "आज तुला पाहिलंय मी, आज तुझाच झालोय मी"
                    -------------------------------------------

आज तुला पाहिलंय मी, आज तुझाच झालोय मी,
माझ्या जीवनातले पहिले प्रेम, आज मिळवलंय मी.
     आज तुला पाहिलंय मी, आज तुझाच झालोय मी,
     माझ्या जीवनातले पहिले प्रेम, आज मिळवलंय मी.

आज मी हे जाणून आहे, आज मी हे ओळखून आहे
तूच माझ्या जीवनाची, एक तृप्त मनीषा आहेस,
     आज तुला पाहिलंय मी, आज तुझाच झालोय मी.

माझी आस अधुरी आहे, माझी इच्छा अपुरी आहे
माझ्या अतृप्त जीवनाचे, तू एक सुंदर भविष्य आहेस,
     आज तुला पाहिलंय मी, आज तुझाच झालोय मी.

तृषार्त आहे तन माझे, प्यासे आहे मन माझे
माझ्या तहानलेल्या जीवनाचा, तू एक सागर आहेस,
     आज तुला पाहिलंय मी, आज तुझाच झालोय मी.

तहान भूक विसरलो मी, देह-धर्म सारे विसरलो मी
तुला पाहून, तुला मिळवून, सारे जग विसरलो मी,
     आज तुला पाहिलंय मी, आज तुझाच झालोय मी.

माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळालेय, साऱ्या शंकाचे निरसन झालेय
निःशंक झालेय मन माझे, प्रिये तुला मिळवून मी,
     आज तुला पाहिलंय मी, आज तुझाच झालोय मी.

अशांत मन शांत झालंय, शांत मन प्रशांत झालंय
प्रेमाने जिंकलस तू मला, माझं मन तुझं झालंय,
     तुझ्या प्रेमाने सर्व दिलं, मला सर्व काही मिळालं,
     इच्छा नाही आता कसली, जीवन माझं परिपूर्ण झालंय.

आज तुला पाहिलंय मी, आज तुझाच झालोय मी
माझ्या जीवनातले पहिले प्रेम, आज मिळवलंय मी
     आज तुला पाहिलंय मी, आज तुझाच झालोय मी
     माझ्या जीवनातले पहिले प्रेम, आज मिळवलंय मी

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.01.2023-रविवार.
=========================================