काही तरी हरवले आहे

Started by anolakhi, September 02, 2010, 10:03:20 PM

Previous topic - Next topic

anolakhi

 काही तरी हरवले आहे त्याचे..
काय कोणास ठाऊक,
पण रोज काहीतरी धुंडाळत असतो...

खिसे,पाकीट....कप्पे कपाट...
सर्व विस्कटून पहिले...
विस्कटण्यासाठी  आत्तातर घरी काहीच नाही राहिले...
काय शोधतो ते त्याला तरी ठाऊक आहे का ? असे कधी तरी प्रश्न पडतो...
काही तरी हरवले आहे त्याचे..
काय कोणास ठाऊक,
पण रोज काहीतरी धुंडाळत असतो...

हल्ली एकटाच बाहेर हिंडताना दिसतो...
मित्रही विचारतात...हल्ली हा कोणत्या जगात रमतो...?
वेळ-काळ विसरून..एकटक कोठेतरी पहात असतो...
विचारले काही...कि...पुन्हा शोधा-शोध सुरु करतो..
काही तरी हरवले आहे त्याचे..
काय कोणास ठाऊक,
पण रोज काहीतरी धुंडाळत असतो...

कधी तरी प्रश्न पडतो...
प्रेमात तर पडला नसेल?
कि...काल जो अंधारात रडत होता...ते...
नकार मिळाला म्हणून तर...रडला नसेल...?
विचारावे म्हणू काही कि....पिंजऱ्यातून पक्ष्याप्रमाणे  ....निसटतो....
काही तरी हरवले आहे त्याचे..
काय कोणास ठाऊक,
पण रोज काहीतरी धुंडाळत असतो...

बस एवढेच वाटते...
ज हरवले असेल...ते लवकर सापडावे..
जर...घाव मनावर...झाला असेल ...तर...लवकर...सुखूदे....
काही तरी हरवले आहे त्याचे..
काय कोणास ठाऊक,
पण लवकर त्याला सापडूदे...

अनोळखी(निलेश)








Umashankar