जीवन-प्रवास-गीत-प्रवास जीवनाचा रम्य आहे, प्रवास जीवनाचा अगम्य आहे

Started by Atul Kaviraje, January 18, 2023, 11:51:40 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक जीवन-प्रवास-गीत ऐकवितो. "ज़िन्दगी का सफ़र है ये कैसा सफर,कोई समझा नहीं कोई जाना नहीं"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही बुधवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (ज़िन्दगी का सफ़र है ये कैसा सफर,कोई समझा नहीं कोई जाना नहीं)
--------------------------------------------------------------------------

                "प्रवास जीवनाचा रम्य आहे, प्रवास जीवनाचा अगम्य आहे"
               ---------------------------------------------------

प्रवास जीवनाचा रम्य आहे, प्रवास जीवनाचा अगम्य आहे,
प्रवास जीवनाचा अटळ आहे, प्रवास जीवनाचा अखंड आहे.

प्रवासातले सारे मुसाफिर आपण
नाही आपले, नाही कोणाचे
भेटती, चालती, विभक्त होती
हीच आहे जीवनाची रीती,
     येथे सतत चालणे आहे,
     प्रवास येथला निरंतर आहे.

प्रवास जीवनाचा रम्य आहे, प्रवास जीवनाचा अगम्य आहे,
प्रवास जीवनाचा अटळ आहे, प्रवास जीवनाचा अखंड आहे.

पथ जीवनाचा दुर्गम असतो
रस्ता जीवनाचा खडतर असतो
खाच-खळग्यांच्या तुडवीत वाटा
तो नेहमीच चालायचा असतो,
     प्रवास येथला कठीण आहे,
     मार्ग येथला अवघड आहे.

प्रवास जीवनाचा रम्य आहे, प्रवास जीवनाचा अगम्य आहे,
प्रवास जीवनाचा अटळ आहे, प्रवास जीवनाचा अखंड आहे.

जीवनाने खूप काही आम्हा शिकविले
आयुष्यात आम्ही खूप काही निभावले
जीवनावर आमचे प्रेम आहे
तरीही मरणाला कवटाळायचे आहे,
     सुटका नाही, भोगायचे आहे,
     सारा नशिबाचा भोग आहे.

प्रवास जीवनाचा रम्य आहे, प्रवास जीवनाचा अगम्य आहे,
प्रवास जीवनाचा अटळ आहे, प्रवास जीवनाचा अखंड आहे.

रडतच जन्मा मनुष्य आलाय
पण जाताना हसतच गेलाय ?
आलाय खरा, जायचे माहित नाही
येथे कोणीही जाणत नाही,
     जन्म आहे त्याला, मृत्यूही आहे,
     जीवनाचा प्रवास असाच आहे.

प्रवास जीवनाचा रम्य आहे, प्रवास जीवनाचा अगम्य आहे,
प्रवास जीवनाचा अटळ आहे, प्रवास जीवनाचा अखंड आहे.

कधी वाटते जगायचे कसे ?
मरणच यावे वाटते असे !
जन्म मरण नाहीय हाती
मग कशाची बाळगावी भीती ?
     हे सर्वच प्राक्तन आहे,
     हे सारे विधिलिखित आहे.

प्रवास जीवनाचा रम्य आहे, प्रवास जीवनाचा अगम्य आहे,
प्रवास जीवनाचा अटळ आहे, प्रवास जीवनाचा अखंड आहे.

बाग आहे पण बहार नाही
फुले आहेत पण सुगंध नाही
येथे भुंग्यांचे गुणगुणणे नाही,
येथे वाऱ्याचे गाणे नाही,
     हा प्रवास असा का आहे ?
     हा प्रवास असाच आहे ?

प्रवास जीवनाचा रम्य आहे, प्रवास जीवनाचा अगम्य आहे,
प्रवास जीवनाचा अटळ आहे, प्रवास जीवनाचा अखंड आहे.

पावले आता थकत चाललीत
खुणांना त्याच्या मिटवत चाललीत
तरीही प्रवास सुरु आहे,
एका न संपणाऱ्या अनंताकडे,
     हा प्रवास असाच आहे !
     कधी कुणी का जाणला आहे ?

प्रवास जीवनाचा रम्य आहे, प्रवास जीवनाचा अगम्य आहे,
प्रवास जीवनाचा अटळ आहे, प्रवास जीवनाचा अखंड आहे.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.01.2023-बुधवार.
=========================================