जीवन-गीत-आज तक्रारींना जीवनात जागाच नाही, तुझ्याविना जीवन हे जीवनच नाही

Started by Atul Kaviraje, January 18, 2023, 12:02:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक जीवन-गीत ऐकवितो. "तेरे बिना ज़िन्दगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं "- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही बुधवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(तेरे बिना ज़िन्दगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं )
------------------------------------------------------------------------

        "आज तक्रारींना जीवनात जागाच नाही, तुझ्याविना जीवन हे जीवनच नाही"
       ----------------------------------------------------------------

आज तक्रारींना जीवनात जागाच नाही, तुझ्याविना जीवन हे जीवनच नाही,
आज तक्रारींना जीवनात जागाच नाही, तुझ्याविना जीवन हे जीवनच नाही.

तुझ्या पावलांची मज ओढ होती
पाऊल-खूण वाळूतली मज खुणावत होती
तुझ्यासह चालण्याची मौज और होती,
तू असता सोबत, मला काहीच कमी नव्हती,
     तू असता सोबत, मला काहीच कमी नव्हती.

आज तक्रारींना जीवनात जागाच नाही, तुझ्याविना जीवन हे जीवनच नाही,
आज तक्रारींना जीवनात जागाच नाही, तुझ्याविना जीवन हे जीवनच नाही.

तुझ्या अश्रूंत मी माझ्या आसवांना पIहिले
तुझ्या आसवांत मी स्वतःला झोकून दिले
झरणाऱ्या आसवांना मी हलकेच आवरले,
हसणाऱ्या पापण्यांआडून तुला मी पाहीले,
     हसणाऱ्या पापण्यांआडून तुला मी पाहीले.

आज तक्रारींना जीवनात जागाच नाही, तुझ्याविना जीवन हे जीवनच नाही,
आज तक्रारींना जीवनात जागाच नाही, तुझ्याविना जीवन हे जीवनच नाही.

तुझ्याकरिता चंद्राला मी थांब म्हणाले
त्या चांदण्यात मी तुला निरखिले
तूच सख्या माझे चांदणे होतास,
तूच सख्या माझा चंद्रही होतास,
     तूच सख्या माझा चंद्रही होतास.

आज तक्रारींना जीवनात जागाच नाही, तुझ्याविना जीवन हे जीवनच नाही,
आज तक्रारींना जीवनात जागाच नाही, तुझ्याविना जीवन हे जीवनच नाही.

निरिच्छ मी, माझ्या साऱ्या आशा मावळल्यात
या मोहातून येत बाहेर, अस्तास त्या गेल्यात
माझ्यासवे तू असता, बागा माझ्या बहरल्यात,
माझ्यासवे तू असता, फुलांनी त्या मोहरल्यात,
     माझ्यासवे तू असता, फुलांनी त्या मोहरल्यात.

आज तक्रारींना जीवनात जागाच नाही, तुझ्याविना जीवन हे जीवनच नाही,
आज तक्रारींना जीवनात जागाच नाही, तुझ्याविना जीवन हे जीवनच नाही.

आज तक्रारींना जीवनात जागाच नाही, तुझ्याविना जीवन हे जीवनच नाही,
आज तक्रारींना जीवनात जागाच नाही, तुझ्याविना जीवन हे जीवनच नाही.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.01.2023-बुधवार.
=========================================