बेवफा सजणीची बेवफाई-विरह-गीत-अव्हेरू नकोस मज प्रिये, प्रेमाची माझ्या कदर ठेव

Started by Atul Kaviraje, January 18, 2023, 05:08:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, बेवफा सजणीची बेवफाई-विरह-गीत ऐकवितो. "मेरे महबूब क़यामत होगी,आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही सांज-बुधवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (मेरे महबूब क़यामत होगी,आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी)
----------------------------------------------------------------------

                    "अव्हेरू नकोस मज प्रिये, प्रेमाची माझ्या कदर ठेव"
                   ---------------------------------------------

अव्हेरू नकोस मज प्रिये, प्रेमाची माझ्या कदर ठेव,
एकवार मजकडे पहा तरी, हीच तुझ्या नजरेची ठेव.

कितीतरी वेळा तुज मी पहिले
कितीतरी वेळा तुला सांगितले
तुझ्यावर निःस्वार्थ प्रेम मी केले
तरीही तू ते दुर्लक्षिले,
     का लाथाडलेस प्रेम माझे ?
     का झिडकारलेस प्रेम माझे ?

अव्हेरू नकोस मज प्रिये, प्रेमाची माझ्या कदर ठेव,
एकवार मजकडे पहा तरी, हीच तुझ्या नजरेची ठेव.

गीत माझे प्रेमाने भरलेले
सच्चाई त्यातील ओतप्रोत भरलेली 
वफाई होती खरे पणाची
बेवफाई नव्हती कधीही असत्याची
     प्रिये, बेवफाई तू केलीस,
     माझ्या नकळत दुसऱ्याची झालीस. 

अव्हेरू नकोस मज प्रिये, प्रेमाची माझ्या कदर ठेव,
एकवार मजकडे पहा तरी, हीच तुझ्या नजरेची ठेव.

या प्रेमानेच येथे मज आणले
तुझ्या ओढीनेच येथे मज ओढले
हे माझे वेडच होते
तुझी प्रतारणा ठाऊक होती,
     तरीही तुझी वाट पाहतोय,
     तुझ्या द्वेषाला प्रेमाने जिंकतोय.
     
अव्हेरू नकोस मज प्रिये, प्रेमाची माझ्या कदर ठेव,
एकवार मजकडे पहा तरी, हीच तुझ्या नजरेची ठेव.

माझ्या प्रेमाला तू दूतकारलेस 
माझ्या प्रेमाला तू अव्हेरलेस
तुझे प्रेमही तो दुर्लक्षिल
जसे माझे मन मोडलेस,
     श्राप नाही माझ्या मनाचा,
     जसे करशील तसे भोगशील.

अव्हेरू नकोस मज प्रिये, प्रेमाची माझ्या कदर ठेव,
एकवार मजकडे पहा तरी, हीच तुझ्या नजरेची ठेव.

तुझे प्राक्तनही तू अनुभवशील
तुझे कर्म येथेच भोगशील
माझ्याशी प्रतारणा करून प्रिये
तू कशी सुखी होशील ?
     नियती सारे पाहत आहे,
     नशिबच सारे घडवत आहे.

अव्हेरू नकोस मज प्रिये, प्रेमाची माझ्या कदर ठेव,
एकवार मजकडे पहा तरी, हीच तुझ्या नजरेची ठेव.

असं असलं प्रिये जरी
नाव तुझंच ओठांवर तरी
आजही तुझ्यावर प्रेम करतोय
अजुनी तुझी वाट पाहतोय,
     परतलीस, तर प्रेम जिंकलं,
     नाहीतर, सारंच मी गमावलं.

अव्हेरू नकोस मज प्रिये, प्रेमाची माझ्या कदर ठेव,
एकवार मजकडे पहा तरी, हीच तुझ्या नजरेची ठेव.

केव्हातरी जाईन तुझ्या घरापुढून
खिडकीत नाही आलीस तरी चालेल
गुलाब फुल ठेवीन तुझ्या द्वाराशी
तीच प्रेमाची अंतिम खूण असेल,
     आता मी तुला नाही दिसणार,
     मी तुला क्षमा नाही करणार.

अव्हेरून चाललीस माझे प्रेम, विरह मी करीन सहन,
झिडकारून गेलीस माझे प्रेम, विरह अग्नीत होईन मी दहन.

अव्हेरून चाललीस माझे प्रेम, विरह मी करीन सहन,
झिडकारून गेलीस माझे प्रेम, विरह अग्नीत होईन मी दहन.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.01.2023-बुधवार.
=========================================