प्रेम-गीत-अगं सजणी गं,तुझ्याविना मी राहीन कसा?अगं राणी गं,तुझ्याविना मी जगेनकसा?

Started by Atul Kaviraje, January 18, 2023, 05:21:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेम-गीत ऐकवितो. "ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही सांज-बुधवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना)
----------------------------------------------------

  "अगं सजणी गं,तुझ्याविना मी राहीन कसा? अगं राणी गं, तुझ्याविना मी जगेन कसा ?"
-------------------------------------------------------------------------

तूच माझी प्रीत आहेस
तूच माझे जीवन आहेस
     तूच माझी गं आहेस मनीषा,
          तुझ्याविना मी राहीन कसा ?
               तुझ्याविना मी जगेन कसा ?

अगं सजणी गं, तुझ्याविना मी राहीन कसा ?
अगं राणी गं, तुझ्याविना मी जगेन कसा ?

तूच माझे फूल आहेस
तूच बहरलेली बाग आहेस
     स्वप्नातली तूच गं आहेस कलिका !
          तुझ्याविना मी राहीन कसा ?
               तुझ्याविना मी जगेन कसा ?

अगं सजणी गं, तुझ्याविना मी राहीन कसा ?
अगं राणी गं, तुझ्याविना मी जगेन कसा ?

हृदयाची धडधड आहेस तू
श्वासातील सुगंध आहेस तू
     तूच आहेस गं माझी तृष्णा !
          तुझ्याविना मी राहीन कसा ?
               तुझ्याविना मी जगेन कसा ?

अगं सजणी गं, तुझ्याविना मी राहीन कसा ?
अगं राणी गं, तुझ्याविना मी जगेन कसा ?

क्षितिजावरली शुभ्र चांदणी तू
चंद्राचे रुपेरी चांदणे तू
     आभाळाची तू गं चंदेरी मलिका !
          तुझ्याविना मी राहीन कसा ?
               तुझ्याविना मी जगेन कसा ?

अगं सजणी गं, तुझ्याविना मी राहीन कसा ?
अगं राणी गं, तुझ्याविना मी जगेन कसा ?

प्रेमाचे तू आहेस धुंद संगीत
सुरांचे तू आहेस मोहक गीत
     तुझ्यावीण अधुरी गं ही कविता !
          तुझ्याविना मी राहीन कसा ?
               तुझ्याविना मी जगेन कसा ?

अगं सजणी गं, तुझ्याविना मी राहीन कसा ?
अगं राणी गं, तुझ्याविना मी जगेन कसा ?

प्रीत राहील ही अशीच अपुली
जरी मजवरी तू नाराज झाली
     ही मैत्री कधी तुटेल का ?
          तुझ्याविना मी राहीन कसा ?
               तुझ्याविना मी जगेन कसा ?

अगं सजणी गं, तुझ्याविना मी राहीन कसा ?
अगं राणी गं, तुझ्याविना मी जगेन कसा ?

तुझ्याविना माझा, दिवस अपूर्ण
तुजवीण रात्र, होत नाही पूर्ण
     तू लाभता मजला, होई संपूर्ण,
          तुझ्याविना मी राहीन कसा ?
               तुझ्याविना मी जगेन कसा ?

अगं सजणी गं, तुझ्याविना मी राहीन कसा ?
अगं राणी गं, तुझ्याविना मी जगेन कसा ?

आजवर होते स्वप्न अधुरे
आजवर होते चित्र अस्पष्ट
     मिळविता तुजला, झाले ते स्पष्ट,
          तुझ्याविना मी राहीन कसा ?
               तुझ्याविना मी जगेन कसा ?

अगं सजणी गं, तुझ्याविना मी राहीन कसा ?
अगं राणी गं, तुझ्याविना मी जगेन कसा ?

तू तेव्हा माझ्या जीवनी आलास
नकळत माझा होऊन गेलास
     प्रेम झाले केव्हाच, कळले ना !
          तुझ्याविना मी राहीन कशी ?
               तुझ्याविना मी जगेन कशी ?

सख्या रे, तुझ्याविना मी राहीन कशी ?
सख्या रे, तुझ्याविना मी जगेन कशी ?

माझी तुझी गोष्ट एकच सारी
तू माझा राजकुमार, मी तुझी परी
     ही गोष्ट खरी होऊ दे ना !
          तुझ्याविना मी राहीन कशी ?
               तुझ्याविना मी जगेन कशी ?

सख्या रे, तुझ्याविना मी राहीन कशी ?
सख्या रे, तुझ्याविना मी जगेन कशी ?

तुझ्या प्रेमात सर्वस्व वाहिले
तुझ्या प्रेमात वेडी झाले
     आता तरी मज स्वीकार ना !
          तुझ्याविना मी राहीन कशी ?
               तुझ्याविना मी जगेन कशी ?

सख्या रे, तुझ्याविना मी राहीन कशी ?
सख्या रे, तुझ्याविना मी जगेन कशी ?

अगं सजणी गं, तुझ्याविना मी राहीन कसा ?
अगं राणी गं, तुझ्याविना मी जगेन कसा ?

सख्या रे, तुझ्याविना मी राहीन कशी ?
सख्या रे, तुझ्याविना मी जगेन कशी ?

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.01.2023-बुधवार.
=========================================