दुःखी मन व जीवन गीत-मन पोळलंय, ज्वाळा पसरल्यात देही, आग कुणी ती विझविल का ?

Started by Atul Kaviraje, January 18, 2023, 06:11:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, दुःखी मनाचे आणि दुःखी जीवनाचे व्यथित करणारे गीत ऐकवितो. "चिंगारी कोई भड़के तो सावन उसे बुझाये"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही सांज-बुधवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (चिंगारी कोई भड़के तो सावन उसे बुझाये)
-----------------------------------------------------

           "मन पोळलंय, ज्वाळा पसरल्यात देही, आग कुणी ती विझविल का ?"
          ------------------------------------------------------------
                       
मन पोळलंय, ज्वाळा पसरल्यात देही
आग कुणी ती विझविल का ?
     राख रांगोळी झालीय जीवनाची,
     परत कुणी ते उभारील का ?

मन पोखरलंय, सारा पोखरून गेलाय देह
ही पोकळी कुणी भरली का ?
     भस्मसात होऊन गेलंय जीवन,
     कुणी फिनिक्स पक्षी होऊन येईल का ?

उजाडलीय माझ्या जीवनाची बाग
अजुनी धुमसतेय अंतर्बाह्य आग
     बहर गेलाय गळून सारा,
     तो मोहरून कुणी देईल का ?

माझे मन कधी मंदिर होते
आज ते उदास, उजाड झालंय
     या देवळातला देव कुणी पाहिलाय का ?
     कुणी ईश्वर होऊन येईल का ?

मित्रांनीच साऱ्या घात केला
त्यापेक्षा तो शत्रू परवडला
     हा घाव कधी भरून निघेल का ?
     कुणी मनमित बनून येईल का ?

मदिरेत आज मी स्वतःला बुडवलंय
वाटतंय, सर्व दुःखे विसरलोय मी
     आता कळलंय ही दारूचं गिळतेय मला,
     हे व्यसन माझं कधी सुटेल का ?

तहानलेला माझा जीव कधीचा
तृषार्त माझे मन कधीचे
     कुणी येऊन ते सिंचेल का ?
     कुणी मन माझे भिजवेल का ?

वादळात मन हेलकावे खातंय
तुफानात देह विदीर्ण झालायं
      माझी नाव किनारी लागेल का ?
      कुणी ती सुखरूप पार लावील का ?

भव-सागरच गिळू पाहतोय अस्तित्त्व
त्यात माझा काय पार लागणार ?
     दुःखाला नाहीय पारावर माझ्या,
     कुणी वाली होऊन येईल का ?

दुःखाने भरलेले जीवन माझे
त्यात सुखाचा लवलेशही नाही
     या डोहातून मला कुणी वाचवेल का ?
     कुणी मला हात देईल का ?

मन पोळलंय, ज्वाळा पसरल्यात देही
आग कुणी ती विझविल का ?
     राख रांगोळी झालीय जीवनाची,
     परत कुणी ते उभारील का ?

मन पोखरलंय, सारा पोखरून गेलाय देह
ही पोकळी कुणी भरली का ?
     भस्मसात होऊन गेलंय जीवन,
     कुणी फिनिक्स पक्षी होऊन येईल का ?

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.01.2023-बुधवार.
=========================================