मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-97-माझा आवडता नेता-नरेंद्र मोदी

Started by Atul Kaviraje, January 18, 2023, 10:25:20 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               "मला आवडलेला निबंध"
                                   निबंध क्रमांक-97
                              ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता नेता-नरेंद्र मोदी"

     भारतात आज पर्यंत अनेक नेते पंतप्रधान व राष्ट्रपती होऊन गेलेत. पण लगातार दोन वेळा प्रचंड बहुमतांनी निवडून येणारे भारतीयाचे सर्वात आवडते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. नरेंद्र मोदी माझे आवडते नेता आहेत. ते स्वतंत्र भारताचे 15 प्रधानमंत्री आहेत. त्याचे पूर्ण नाव नरेंद्र दामोदरदास मोदी असे आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये पाहिली निवडणूक लढवली व ते प्रचंड बहुमतांनी विजयी देखील झाले या नंतर 2019 साली देखील त्यांना जनतेने पुन्हा निवडून दिले.

     नरेंद्र मोदींचा जन्म 17 सप्टेंबर 1950 साली गुजरातमधील वडनगर गावी झाला. भारत पाकिस्तान युधादर्म्यान त्यांनी रेल्वे स्टेशन वर असलेल्या सैनिकाची मनोभावे सेवा केली. किशोर अवस्थेत त्यांनी आपल्या भावासोबत एक चहा ची दुकान देखील चालवली. लहानपणापासूनच नरेंद्र मोदींची धर्मा मध्ये रुची होती साधू संत याचे सरल जीवन त्यांना प्रभावित करत असे. बऱ्याचदा त्यांनी हिमालयात जाऊन ध्यान व तप पण केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते नियमित जात असत. येथूनच त्याच्या देशाविषयी प्रेम व देशभक्तीची भावना विकसित झाली.

     नंतरच्या काळात मोदी राजनीति मध्ये आले, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून ते काम सांभाळू लागले. 2001 साली ते पहिल्यांदाच गुजरातचे मुख्यमंत्री बनले. 2001 पासून ते 2014 पर्यंत ते गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. नरेंद्र मोदींच्या विकास कार्यामुळे गुजरातची खूप प्रगती झाली. मोदी एक चांगले वक्ता आहेत. स्वभावाने अतिशय शांत, प्रेमळ व साधे अशे त्याचे व्यक्तिमत्त्व आहे. 2014 मध्ये पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी अनेक योजना लागू केल्या. सेनेला मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या निर्णय पण घेतले.

     नरेंद्र मोदी भारताच्या सर्वात यशस्वी नेत्या पैकी एक आहेत. देशाच्या विकासामध्ये त्याचे कार्य मोलाचे आहे व अजुनही ते आपले कार्य करीत आहेत. म्हणूनच माझे आवडते नेता नरेंद्र मोदी हे आहेत.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.01.2023-बुधवार.
=========================================