प्रेरणादायी-कविता-गीत-मंजिल तुझ्या नजरेत आहे, रस्ता तुझ्या ओळखीचा आहे

Started by Atul Kaviraje, January 19, 2023, 12:30:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेरणादायी-कविता-गीत ऐकवितो. "मंज़िलें अपनी जगह हैं, रास्ते अपनी जगह"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही गुरुवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (मंज़िलें अपनी जगह हैं, रास्ते अपनी जगह)
-----------------------------------------------------

                  "मंजिल तुझ्या नजरेत आहे, रस्ता तुझ्या ओळखीचा आहे"
                 -------------------------------------------------

मंजिल तुझ्या नजरेत आहे,
रस्ता तुझ्या ओळखीचा आहे
फक्त पावलांची साथ हवी
इच्छाशक्ती तुझी दुर्दम्य हवी,
     टप्पा सहजी पार करशील,
     तुज हवे ते तू मिळवशील.

मुशाफिरा, फिरू नकोस माघारी
कुणीच नसेल तुझ्यासवे जरी
तुझ्या पावलांना ओढ हवी
कितीही येवोत संकटे नवी,
     तुला एकटेच आता चालायचेय,
     तुला हिमालय पर्वत लांघIयचेय.

आज तुझ्याबरोबर नाही कुणीही
साऱ्यांनी साथ सोडलीय तुझीही
हताश का होतोस तू ?
हिरमुसला का होतोस तू ?
     तुझे दुःख तू स्वतःच सांभाळ,
     या दुःखाचा तू कर प्रतिपाळ.

तुझी मंजिल तू मिळवशील
जिद्द ठेव, हिम्मत ठेव
हरू नकोस, चालत राहा
तुझ्या पावलांना तू सांगून ठेव,
     हिमशिखरे तुझं देताहेत साद,
     पार करशील तू निर्विवाद.

धैर्य बाळग, हतवीर्य नको होऊस
द्विधा मनःस्थितीत तू नको राहूस
एकट्यानेच जिंकायचीय ही लढाई
जिद्दीने पुन्हा सुरु कर चढाई,
     हौसला बाळगून चालत राहा,
     मंजिल नजरेच्या टप्प्यात आहे पहा.

होश ठेवून जोशीला हो
धीर ठेवून अग्रेसर हो
थकू नकोस, चालत राहा
तुझ्या मंजीलीस पाहत राहा,
     बघ ते ठिकाण आलंय,
     पहा, तुझे मनोवांछित स्थळ आलंय.

दाखवून दे सर्वांस पुनः एकदा
याआधीही दाखविलेस तू कित्येकदा
एकट्यानेही सर्व साध्य होतंय
जरी आपलाही परका होतोय,
     स्वप्नपुर्ती तुझ्या डोळ्यांनी पहा,
     तुझी मंजिल तू गाठलीस पहा.

तुझी मंजिल तू पार केलीस
दुर्दम्य इच्छाशक्तीने ती तू मिळवलीस
तुझ्या पावलांनी तुज साथ केली
तू परिस्थितीवर सहजी मात केलीस,
     तूच हे करू शकतोस, मानवा,
     तुझी मंजिल अखेर तू मिळवलीस.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.01.2023-गुरुवार.
=========================================