प्रेम-कविता-गीत-माझी जीवन संगिनी होशील का, माझी जीवन रागिणी होशील का ?

Started by Atul Kaviraje, January 19, 2023, 05:41:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेम-कविता-गीत ऐकवितो. "मेरे नसीब में तू है के नहीं, तेरे नसीब में मैं हूँ के नहीं"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही सांज-गुरुवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (मेरे नसीब में तू है के नहीं, तेरे नसीब में मैं हूँ के नहीं)
----------------------------------------------------------------

            "माझी जीवन संगिनी होशील का, माझी जीवन रागिणी होशील का ?"
           ------------------------------------------------------------

माझी जीवन संगिनी होशील का,
माझी जीवन रागिणी होशील का ?

नशीबच ठरवेल ते आता
तकदीर घडवेल ते स्वतः
नशिबात असेल तेच घडेल
आपले नशीब येथेच घडेल,
     माझे प्रेम आहे तुजवरी,
     सांग तू माझी होशील का ?

माझी जीवन संगिनी होशील का,
माझी जीवन रागिणी होशील का ?

स्वर्गात मारल्यात गाठी लग्नाच्या
विधात्याने त्या स्वतः रेखाटल्यात
त्या नाहीत तुटत अश्या
त्या नाहीत सुटत अश्या,
     भेट झाली तुझी आणि माझी,
     सांग, तू मला स्वीकारशील का ?

माझी जीवन संगिनी होशील का,
माझी जीवन रागिणी होशील का ?

तुझ्याच स्वप्नात होते मी साजणा
विहरत होते तुझ्यासवे मी साजणा
अवचित मज घातलीस मागणी
लाजेने चूर झाली तुझी राणी,
     होकार आहे माझा तुला,
     स्विकारी मग आता मजला.

तुझी जीवन संगिनी होईन मी साजणा,
तुझी जीवन रागिणी होईन मी साजणा.

सत्य आहे की स्वप्न सख्या
भारावून गेले मी बघ लाडक्या
स्वप्नांतून मी आले बाहेर
तुझ्या शब्दांत फुलला मोहर,
     जीवनात माझ्या तू बघ आलास,
     पाहता पाहता माझा झालास.

तुझी जीवन संगिनी होईन मी साजणा,
तुझी जीवन रागिणी होईन मी साजणा.

गाठीभेटी अपुल्या होत राहिल्या
दिन रातीच्या प्रत्येक क्षणाला
तू माझे मन बघ जिंकलस
मन माझे तू हिरावून घेतलंस,
     तुझ्यातच हरवून गेले मी साजणा,
     तुज होकार देऊन बसले साजणा.

तुझी जीवन संगिनी होईन मी साजणा,
तुझी जीवन रागिणी होईन मी साजणा.

आपल्या प्रेमाआड कोणी नाही
स्वर्ग माझा, माझ्या समोर येई
सुखावले मी, आनंदले मी
तुला मिळवून मी साजणा,
     जन्मोजन्मीचा तू माझा साथीदार,
     तुला कधीही अंतर नाही देणार.

तुझी जीवन संगिनी होईन मी साजणा,
तुझी जीवन रागिणी होईन मी साजणा.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.01.2023-गुरुवार.
=========================================