मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-185

Started by Atul Kaviraje, January 19, 2023, 09:57:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  मला आवडलेल्या चारोळ्या
                                     चारोळी क्रमांक-185
                                 -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं-चारोळीकाराने  येथे  प्रेमाचे  एक  सुंदर  उदाहरण  या  चारोळीद्वारे  दिले  आहे . त्याच्या  चारोळीतील  प्रियकर  आपल्या  प्रेयसीस  म्हणतोय , की  आपल्या दोघांचं  प्रेम  जमलं  जरूर  होते , पण  केव्हातरी  आपणा  दोघांनाही  त्यात  विरह  सहन  करावा  लागला  होता . ते जणू रुसूनच गेले होते. पण  आता  आपले  हरवलेले  प्रेम  पुन्हा  परत  मिळाले  आहे . ते  स्वप्न  पुन्हा  तुझ्या  रूपे  माझे  पूर्ण  झाले  आहे, परत  मिळाले  आहे . ते  तुझ्या  सहवासानेच  मला  प्राप्त  झाले  आहे . शेवटी  शेवटी  मला  असं  वाटत  होत  की , कधी  प्रेमच  करू  नये . पण  तुझ्यावरल्या  सुंदर  प्रेमाने  ही  कल्पनाच  फोल  ठरवली . तूच  आहेस  प्रिये , ते   स्वप्न  जागवणारी  मलिका , तूच  आहेस  माझ्या  रुसलेल्या   या  प्रेमास  हसवणारी  एक  मोहक  कलिका . तुझे  खूप  खूप  आभार , मी  तुझा   अत्यंत  ऋणी  आहे .

========================
💝 "हरवले होते ते स्वप्न माझे
जे तुझ्या रुपाने परत मिळाले,
रुसले होते ते प्रेम माझे
जे तुझ्या साथिने परत आले,
प्रेम करावं कि नाही अस सदाहि वाटत होतं
पण तुझ्या सुंदर प्रेमाने मला शेवटि करावेच लागले,
तुच आहेस त्या स्वप्नांना जागवणारी,
तुच आहेस त्या रुसलेल्या प्रेमाला हसवणारी." 💘
========================

--नवं-चारोळीकार
----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.01.2023-गुरुवार.
=========================================