मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-73-गप्पा गणितज्ञाशी ! - भाग 5/5

Started by Atul Kaviraje, January 19, 2023, 10:14:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-73
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "गप्पा गणितज्ञाशी! भाग 5/5)"

                              गप्पा गणितज्ञाशी ! - भाग 5/5--
                             ---------------------------

     रूपालीच्या आतल्या कोपऱ्यात डॉ. भास्कर आचार्य कॉफी पीत बसले होते. मला पाहता क्षणीच बसण्याची खूण करत खिशातून चिठ्ठी काढून माझ्या हाती सरकवली. चिठ्ठीतील कूट प्रश्न अशा प्रकारे होते.

प्रश्न 1--
------

     घोड्यांच्या रेसमध्ये भरपूर कमाई केलेल्या एका श्रीमंताचा वृद्धाप्यकाळात मृत्यु होतो. मृत्युपश्चात त्याच्या इस्टेटीची, मालमत्तेची वाटणी त्याच्या तिन्ही मुलात मृत्युपत्रानुसार करण्याची जबाबदारी त्याच्या वकिलावर होती. सर्व काही बापाच्या इच्छेनुसार वाटणी झाली परंतु रेसच्या घोड्याच्या वाटणीच्या मुद्द्यावर गाडी अडून बसली. मृत्युपत्रात उल्लेख केल्याप्रमाणे एकूण घोड्यापैकी अर्धे घोडे पहिल्या मुलाला, एक तृतियांश घोडे मधल्या मुलाला व एक नवमांश घोडे धाकट्याला द्यावयाचे होते. परंतु मृत्युच्या वेळी त्यांच्याकडे फक्त 17 घोडे शिल्लक होते. काही घोड्यांची विक्री वा दान करून वाटणी न्यायसंमत ठरले नसते. खरे पाहता वकील भावाभावामध्ये भांडण लावून कमाई कशी करता येईल याचा विचार करत होता. परंतु मोठा भाऊ शेजारीच असलेल्या व रेसचे घोडे बाळगणाऱ्या वडिलाच्या मित्राला बोलावून या पेचप्रसंगातून मार्ग काढण्याची विनंती करतो. हा मित्र योग्य वाटणी करून तिढा सोडवतो. मित्राने हा तिढा कसा सोडवला असेल याची तुम्ही कल्पना करू शकाल का?

प्रश्न 2--
------

     एका राजकुमाराला शेजारच्या राज्यातील राजकुमारीशी लग्न करायचे होते. परंतु शेजारच्या राजाला हा राजकुमार स्वत:च्या मुलीशी लग्न करण्यास योग्य आहे की नाही याची परीक्षा घ्यायची होती. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास लग्न लावून देण्यास त्याची हरकत नव्हती. परीक्षेसाठी राजकुमार दरबारात हजर होतो. राजा त्याला तेथे एका बाजूला असलेल्या दोन बंद दरवाज्यांकडे बोट दाखवत यातील एक दरवाजा तुला वधस्तंभाकडे नेणारा व दुसरा तुला सुरक्षित ठिकाणी पोचविणारा आहे. या दरवाज्यांच्या पहाऱ्यासाठी रखवालदार आहेत. यापेकी एक रखवालदार नेहमी खोटे बोलणाऱ्या टोळीतला व दुसरा नेहमी खरे बोलणाऱ्या टोळीचा आहे. तुझे काम एवढेच की यातील एकाला असा प्रश्न विचारायचा की त्याच्या उत्तरातून तू सुरक्षितपणे बाहेर नेणाऱ्या दरवाज्यातून बाहेर पडू शकशील. राजकुमाराने विचारलेला प्रश्न कोणता असेल?

     खिशात चिठ्ठी ठेवत मी डॉक्टरांच्या बघत बसलो.

     डॉक्टर क्षणभर गप्प बसून-तुमच्या येथील वाहतूक व्यवस्था इतकी गचाळ आहे की त्याची कल्पना करवत नाही. स्टीअरिंग व्हील हातात धरून बसलेला हा प्राणी नेहमीच युद्धाच्या आवेशात असतो की काय? समोर जे काही दिसेल त्याला धडक मारत पुढे पुढे जात असतो. रहदारीचे नियम पाळण्यासाठी नाहीतच हे त्याच्या मनात ठसविलेले असते अशी मला शंका आहे.

     डॉक्टर आचार्य लॅपटॉप उघडतच रहदारींच्या नियमांची कशी पायमल्ली होत आहे याचे चित्रणच मला दाखवतात.

     त्यानी दाखवलेला प्रसंग असा होता. शहराच्या उपनगरातील एका अरुंद रस्त्यावर एक जण इंडिका / मारुती 800 टाइप असलेली कार मर्यादित वेगाने चालवत होता. रस्ता अरुंद व रस्त्याच्या दोन्ही बाजूला खणून ठेवलेले असल्यामुळे खड्ड्यात भरपूर चिखल व गढूळ पाणी. पाठीमागून एक SUV (स्पोर्ट्स युटिलिटी वेहिकल् ) जोराने भरधाव वेगाने आली. कदाचित या SUVच्या मालकाला पुढे जाण्याची घाई असावी. रस्ता अरुंद असल्यामुळे ओव्हरटेक करून पुढे जाता येत नव्हते. हॉर्न वाजवतो. काही उपयोग नाही. पुढचा ड्रायव्हर शांतपणे जात असतो. गाडी रेस करतो. काही उपयोग नाही. पुढची गाडी अजूनही बैलगाडीच्याच वेगाने रस्त्याच्या मधोमध. एका विशिष्ट क्षणी SUVचा ड्रायव्हर डाव्या बाजूने ओव्हरटेक करून पुढे जातो. परंतु गाडी स्लिप होऊन खड्ड्यातील चिखलात घुसून रुतून बंद पडते. हा ड्रायव्हर हातवारे करत, ओरडत बाहेर काढण्याची विनंती करू लागतो. मात्र पुढचा ड्रायव्हर अगदी ढिम्म. कशी जिरली या तोऱ्यात हसत बाय बाय करत पुढे निघून जातो.

--प्रभाकर नानावटी
(March 14, 2013)
--------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.01.2023-गुरुवार.
=========================================