प्राक्तन-कविता-गीत (SAD-SONG)-नशिबानेच खेळ मांडलाय माझा, इथे दोष नाहीय कुणाचा

Started by Atul Kaviraje, January 19, 2023, 10:36:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, नशीब-प्राक्तन-कविता-गीत (SAD-SONG) ऐकवितो. "घुंघरू की तरह बजता ही रहा हूँ मैं"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही निशा-गुरुवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (घुंघरू की तरह बजता ही रहा हूँ मैं)
-------------------------------------------------

                  "नशिबानेच खेळ मांडलाय माझा, इथे दोष नाहीय कुणाचा"
                 --------------------------------------------------
                           
नशिबानेच खेळ मांडलाय माझा,
इथे दोष नाहीय कुणाचा.

कधी कुणी भिरकावून दिले
कधी कुणी हिसकावून घेतले
माझे मीपण नाहीच राहिले
माझे अस्तीत्व काहीच नुरले,
     खेळणंच झालोय इतरांच्या हातचं,
     कुणीही खेळायचं अन टाकून द्यायचं.

नशिबानेच खेळ मांडलाय माझा,
इथे दोष नाहीय कुणाचा.

कधी पैंजण होऊन पायातले
वाजत राहिलो इथे अन तिथे
कधी या पायातून त्या पायात
होतो मी नेहमीच बंधनात,
     बांधलो गेलो, मुक्तता नाही,
     नाचवला गेलो, मन देतंय ग्वाही.

नशिबानेच खेळ मांडलाय माझा,
इथे दोष नाहीय कुणाचा.   

नाचता नाचविता तुटत राहिलो
जोडले तरी फुटत राहिलो
तुटणे अन फ़ुटणेच आहे नशिबात
जोडणे अन सांधणे दुसऱ्यांच्या हातात,
     एकसंध नाही, फुटकेच नशीब माझे,
     अखंड नाही, विखुरलेले प्राक्तन माझे.   

नशिबानेच खेळ मांडलाय माझा,
इथे दोष नाहीय कुणाचा.   

माझे मन होते मला म्हणत
उत्तरलो मी त्यास कण्हत कण्हत
मनातली गोष्ट फक्त मनातच राहिली
घुसमट मनातली दाबूनच ठेवली,
     माझे स्वातंत्र्यच घेतलंय हिरावून,
     माझे अस्तीत्वच घेतलंय ओरबाडून.

नशिबानेच खेळ मांडलाय माझा,
इथे दोष नाहीय कुणाचा.   

आपलेच माझे शत्रू झालेत
परक्यांची तर बातच सोडा
माझे माझे म्हणता कुणीच नाही
येथे कुणी कुणाचे नाही,
     नशिबाचेच आहेत सारे भोग,
     आता नाही घेता येत कुठलेच सोंग.

नशिबानेच खेळ मांडलाय माझा,
इथे दोष नाहीय कुणाचा.   

असेच जीवन जगायचे आता
इतरांच्या हातचे बाहुले बनून
स्वतःच्या मताच्या करुन ठिकऱ्या
अजीजी करायची गुलाम होऊन,
     काय हे तुझे जिणे, लाचारा,
     मिंधा होऊनच राहायचे, पामरा.

नशिबानेच खेळ मांडलाय माझा,
इथे दोष नाहीय कुणाचा.   

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.01.2023-गुरुवार.
=========================================