विरह कविता-गीत-हमसफर व्हायची स्वप्ने दिलीस, मध्येच साथ सोडून गेलीस ?

Started by Atul Kaviraje, January 20, 2023, 11:19:58 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, विरह कविता-गीत ऐकवितो. "हम और तुम थे साथी, अभी है कल की बात"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही शुक्रवार-सकाळ  आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (हम और तुम थे साथी, अभी है कल की बात)
--------------------------------------------------------

               "हमसफर व्हायची स्वप्ने दिलीस, मध्येच साथ सोडून गेलीस ?"
              -----------------------------------------------------

हमसफर व्हायची स्वप्ने दिलीस,
मध्येच साथ सोडून गेलीस ?
माझी साथ करणार होतीस, जन्मभर,
अशी कशी मज टाकून केलीस ?

हमसफर व्हायची स्वप्ने दिलीस,
मध्येच साथ सोडून गेलीस ?
माझी साथ करणार होतीस, जन्मभर,
अशी कशी मज टाकून केलीस ?

काल परवाचीच बात सखे
सख्य जुळले होते प्रेमाचे
ते सारे तू विसरून गेलीस ?
तू अशी का वागलीस ?
     हमसफर व्हायची स्वप्ने दिलीस,
     मध्येच साथ सोडून गेलीस ?

वणवा पेटलाय माझ्या मनी
दाहकता भरवून माझ्या देही
सर्व काही सहन करूनही
अशी प्रतारणा का केलीस ?
     हमसफर व्हायची स्वप्ने दिलीस,
     मध्येच साथ सोडून गेलीस ?

तरी गप्प आहे मी
कुणापाशी तक्रार करू मी
आपलेच खोटे वागू लागलेत
माझीच वैरीण का झालीस ?
     हमसफर व्हायची स्वप्ने दिलीस,
     मध्येच साथ सोडून गेलीस ?

सर्व आशा भग्न झाल्यात
आकांक्षांची झालीय राख रांगोळी
नुरल्यात आता इच्छा काहीही
साऱ्या पायदळी तुडवून गेलीस ?
     हमसफर व्हायची स्वप्ने दिलीस,
     मध्येच साथ सोडून गेलीस ?

प्रकाशाचा कुठेच किरण नाही
सारं काही अंधारमय होई
माझ्या जगात काळोख करून
मला चाचपडत ठेवून गेलीस ?
     हमसफर व्हायची स्वप्ने दिलीस,
     मध्येच साथ सोडून गेलीस ?

हे तुफान कधी शमणार ?
हे वादळ कधी थांबणार ?
या भवसागरात, या महापुरात
माझी नाव बुडवून गेलीस ?
     हमसफर व्हायची स्वप्ने दिलीस,
     मध्येच साथ सोडून गेलीस ?

वाटतंय निघून जावं केव्हातरी
जग सोडून तुझं आतातरी
जाताना थांब म्हणशील का ?
स्वप्नांना चूर करून गेलीस ?
     हमसफर व्हायची स्वप्ने दिलीस,
     मध्येच साथ सोडून गेलीस ?

तरीही वाट पाहतोय तुझी
तू कधी होशील राजी
नाही, दयेचा लवलेशही नाही
माणुसकी अशी  दाखवून  गेलीस ?
     हमसफर व्हायची स्वप्ने दिलीस,
     मध्येच साथ सोडून गेलीस ?

एकटा पडलोय मी आज
प्रवास माझा एकलाच आज
हमसफर माझ्या नशिबी नाही
मज एकटा टाकून गेलीस ?
     हमसफर व्हायची स्वप्ने दिलीस,
     मध्येच साथ सोडून गेलीस ?

हमसफर व्हायची स्वप्ने दिलीस,
मध्येच साथ सोडून गेलीस ?
माझी साथ करणार होतीस, जन्मभर,
अशी कशी मज टाकून केलीस ?

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.01.2023-शुक्रवार. 
=========================================