प्रश्नचिन्ह असलेली एक कविता-मी असा का वागतो ? माझे मलाच कळत नाही !

Started by Atul Kaviraje, January 20, 2023, 11:27:32 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     कधी कधी माणसं अशी का वागतात, हा प्रश्न मनाला पडतो. इतरांचं सोडा, मी असा का वागतो, हे माझं मला कधीच कळतं नाही. याचे उत्तर आजही माझ्याकडे नाही. कुणाला सापडलं तर मला नक्की कळवा. वाचूया तर या गूढ, अनाकलनीय प्रश्नावर एक प्रश्नचिन्ह असलेली एक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "मी असा का वागतो ? माझे मलाच कळत नाही !"
     
                     "मी असा का वागतो ? माझे मलाच कळत नाही !"
                    --------------------------------------------
                                 
मी असा का वागतो ?
माझे मलाच कळत नाही
समजण्याचा प्रयत्न करतोय खरा,
कळले तरीही वळत नाही.

     असंख्य प्रश्नांनी सोडलंय भंडावून
     उत्तरेच नाहीत मिळत कधीपासून
     मग त्रागा करीत राहतो,
     मलाच त्रास करून घेतो.

लोकांनी बोललेले असह्य होते
बोटे रोखल्यावर राग येतो
कोणाचेच ऐकून घेत नाही,
सतत आक्रस्ताळेपणा करीत राहतो.

     काम वेळेवर होत नाही
     रागाचा पारा माझ्या चढतो
     उशीर झालेला चालत नाही,
     दुसऱ्यांच्या अंगावर वसकन ओरडतो.

अतिशय चंचल वृत्तीचा मी
अत्यंत उतावळा माणूस मी
सांगितलेली गोष्ट ताबडतोब हवी,
नाहीतर कोणाचीच खैर नाही.

     मी असा का वागतो ?
     माझे का असे वर्तन ?
     राग, मत्सर, द्वेष, त्वेष यांनी,
     परिपूर्ण भरलेले माझे मन.

बदलायचे म्हणता येत नाही
आता तशी सवयच नाही
संयम ठेवायचा प्रयत्न करतो,
पण त्याचाच तोल बिघडतो.

     मी असा का वागतो ?
     माझेच मला कळत नाही
     बदल केव्हा होईल माझ्यात ?
     कळत असून वळत नाही.
     
स्वभाव बदलता येत नाही
BAD HABITS DIE HARD
स्वभावाला शेवटी औषधच नसते,
कोणतीच मात्र लागू नसते.

     याही वयात असाच स्वभाव
     शेवटी मलाच तो नडतो
     मी असा का वागतो ?
     मी असा का वागतो ?

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.01.2023-शुक्रवार.
=========================================