प्रेम-आठवण कविता-गीत-आठवणीत तू आजही आहेस, धडकन माझी सांगत आहे !

Started by Atul Kaviraje, January 20, 2023, 12:13:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेम-आठवण कविता-गीत ऐकवितो. "आए तुम याद मुझे, गाने लगी हर धड़कन"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही शुक्रवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (आए तुम याद मुझे, गाने लगी हर धड़कन)
------------------------------------------------------

                "आठवणीत तू आजही आहेस, धडकन माझी सांगत आहे !"
               ----------------------------------------------------

आठवणीत तू आजही आहेस,
धडकन माझी सांगत आहे !
तुला विसरून कसं चालेल,
हृदय माझे बोलत आहे.

आठवणीत तू आजही आहेस,
धडकन माझी सांगत आहे !
तुला विसरून कसं चालेल,
हृदय माझे बोलत आहे.

तुझ्या आठवणींचा पसरवीत सुगंध
तुझ्या अस्तित्त्वाचा दरवळीत परिमळ
आजही आहेस माझ्या मनात
वाहणारा वारा सांगत आहे,
     आठवणीत तू आजही आहेस,
     धडकन माझी सांगत आहे !

चंदनाचा आभास उत्पन्न करीत
मोहक सुरभ मनात भिनवीत
तुझीच आठवण काढतेय ती
समीर ग्वाही देत आहे,
     आठवणीत तू आजही आहेस,
     धडकन माझी सांगत आहे !

निसर्ग तुला सजवीत आहे
तुला नवं-वधूचे रूप देत आहे
तुझे आवडते स्वप्न होते
वृक्ष-वल्ली मज वदत आहे,
     आठवणीत तू आजही आहेस,
     धडकन माझी सांगत आहे !

तळहातावरल्या मेंदीचा लाल रंग
याद करून गेला तुझा संग
लाजून चूर झालेला तेव्हाचा
तुझा चेहराच बोलत आहे,
     आठवणीत तू आजही आहेस,
     धडकन माझी सांगत आहे !

जेव्हा एकटा असतो मी
तुला तारकांत पाहतो मी
प्रत्येक चांदणीत तुझीच प्रिया,
चंद्र हासरा सांगत आहे,
     आठवणीत तू आजही आहेस,
     धडकन माझी सांगत आहे !

असंख्य तारका मोजता मोजता
तुझी आठवण येता येता
मी आहे अजुनी प्रिया, येथेच
तुझा पायरव निनादत आहे,
     आठवणीत तू आजही आहेस,
     धडकन माझी सांगत आहे !

तुझीच आहे आजही ती
तुझ्या जवळच आहे ती
जिच्या विचारात तू आहेस
मन मला सांगत आहे,
     आठवणीत तू आजही आहेस,
     धडकन माझी सांगत आहे !

तिची ओंजळ भर फुलाने
तीच मन भर प्रेमाने
ती मोहक, महकती आठवण
बाग करून देत आहे,
     आठवणीत तू आजही आहेस,
     धडकन माझी सांगत आहे !

तुझ्या आठवणींवरच जगतोय आज
तुला आठवणींतच पाहतोय आज
तिच्या आठवणीच तुझा सहारा आहेत,
आठवणीच आठवण करून देताहेत,
     आठवणीत तू आजही आहेस,
     धडकन माझी सांगत आहे !

आठवणीत तू आजही आहेस,
धडकन माझी सांगत आहे !
तुला विसरून कसं चालेल,
हृदय माझे बोलत आहे.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.01.2023-शुक्रवार. 
=========================================