व्यथित-दुःखी मनाची कविता-गीत-ठरवलं होत मनाने माझ्या , पण आणलंय पावलाने माझ्या

Started by Atul Kaviraje, January 20, 2023, 05:12:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, व्यथित-दुःखी मनाची कविता-गीत ऐकवितो. "कहाँ जा रहा था,कहाँ आ गया हूँ"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही सांज-शुक्रवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (कहाँ जा रहा था,कहाँ आ गया हूँ)
-----------------------------------------------

                "ठरवलं होत मनाने माझ्या , पण आणलंय पावलाने माझ्या"
               ---------------------------------------------------

ठरवलं होत मनाने माझ्या,
पण आणलंय पावलाने माझ्या 
माझ्या मनाला नाही दिशा,
जातोय, पावले नेतील तसा.

ठरवलं होत मनाने माझ्या,
पण आणलंय पावलाने माझ्या 
माझ्या मनाला नाही दिशा,
जातोय, पावले नेतील तसा.

माझं मलाच कळतं नाहीय
मन तर आहे खंबीर
सुरुवात तर होतंच नाही
शेवट तर नसेल गंभीर ?
     आदी नाही अंत नाही,
     असा कसा प्रवास नशिबाचा ?

ठरवलं होत मनाने माझ्या,
पण आणलंय पावलाने माझ्या. 

प्रेम केलं होतं केव्हातरी
मन दिल होतं केव्हातरी
अवचितच सारं घडलं होतं
असं कसं ते नडलं होतं ?
     अजुनी पडलाय प्रश्न मनाला,
     आजही आहे खंत मनाला.

ठरवलं होत मनाने माझ्या,
पण आणलंय पावलाने माझ्या. 

पाहिली होती स्वप्ने सप्तरंगी
बरसात होती फुलांची रंगीबेरंगी
विरस होतं होता स्वप्नांचा
रंगाचा होतं होता बेरंग,
     कोणताच रंग नव्हता जीवनात,
     चित्रपट जीवनाचा जणू कृष्ण-पटलात.   

ठरवलं होत मनाने माझ्या,
पण आणलंय पावलाने माझ्या. 

साज माझा उदास आहे
जो संगीताने रसरसला होतंI
भावना माझ्या कोमेजल्या आहेत
ज्या जीवनरसाने परिपूर्ण होत्या,
     सुरावटीत आज जादूच नाही,
     मैफिलीत आज कुणीच नाही.

ठरवलं होत मनाने माझ्या,
पण आणलंय पावलाने माझ्या. 

वाऱ्याने आज मौन धरलंय
आज फुलाने फुलणं सोडलंय
आज बागेत बहार नाही
आज फुलांचा मोहर नाही,
     सारे काही निस्तेज, कोमेजलेले,
     आज फुलांत मधुरसच नाही.

ठरवलं होत मनाने माझ्या,
पण आणलंय पावलाने माझ्या. 

वाट पाहतोय फुले उमलण्याची
वाट पाहतोय सुगंध पसरण्याची
फुलांचे उमलणे तर सोडाच
वाट्यास आलेत काटेच काटे,
     मधुबन खुशबू देत नाही,
     ऋतूंचा बहरच येत नाही.

ठरवलं होत मनाने माझ्या,
पण आणलंय पावलाने माझ्या. 

वाटलं होत प्रकाश येईल
माझे जीवन उजळून टाकील
जीवन झाकोळलंय माझं अंधारानेच
आशेचा एकही किरण नाही,
     जीवन-सूर्याचा केव्हाच झालाय अस्त,
     निराशेने जीवन झालेय ग्रस्त.

ठरवलं होत मनाने माझ्या,
पण आणलंय पावलाने माझ्या .

माझ्या मुखाने दुवा निघाला होता
माझ्या मनाने आशिष दिला होता
आज बेवफाईस बद-दुवाच निघतोय
गुन्हयाचा हाच श्राप ठरतोय,
     बदफैली तुझी मी पाहतोय,
     नावाची बदनामी कसोशीने टाळतोय.

ठरवलं होत मनाने माझ्या,
पण आणलंय पावलाने माझ्या. 

माझं मनचं मानत नाही
सार मनाविरुद्धच होत राही
ठरवलंय, पावले नेतील तिथे जावं
जे नशिबी आलय, ते भोगावं,
     माझ्याकडे आता पर्यायच नाही,
     दुसरा काही उपायच नाही.

मनाचं आता मी ऐकत नाही
पावले नेतील तिथे जातो
पावले थांबली, मीही थांबतो
मी आता पावलांचेच ऐकतो,
     मनाची उमेद केव्हाच सरलीय,
     मनाचा उत्साह केव्हाच ओसरलाय.

मनाची उमेद केव्हाच सरलीय,
मनाचा उत्साह केव्हाच ओसरलाय.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.01.2023-शुक्रवार. 
=========================================