नशीब प्रेम कविता-गीत-नशिबाची साथ मला मिळाली, नशिबानेच मला तू मिळालास

Started by Atul Kaviraje, January 21, 2023, 12:27:40 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, नशीब प्रेम कविता-गीत ऐकवितो. "मेरे नसीब में तू है के नहीं, तेरे नसीब में मैं हूँ के नहीं"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही मध्यरात्र-शनिवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (मेरे नसीब में तू है के नहीं, तेरे नसीब में मैं हूँ के नहीं)
----------------------------------------------------------------

              "नशिबाची साथ मला मिळाली, नशिबानेच मला तू मिळालास"
             -----------------------------------------------------

नशिबाची साथ मला मिळाली,
नशिबानेच मला तू मिळालास
बाकी मी काही जाणत नाही,
ऋणी नशिबाची मी सख्या राही.

घडलं कसं कळलं नाही
कधी घडलं समजलं नाही
नशिबानेच आणलंय एकत्र आपणांस,
विधाताच सर्व लिहीत राही.

एकेदिनी स्वप्नी माझ्या आलास
रुंजी मजभोवती घालू लागलास
पाहता सख्या मी बावरले
पाहता सख्या मी घाबरले
     मला पाहुनी मज तू म्हणालास
     मला तू दिलासा दिलास
     नकोस घाबरू, नको तू लाजू,
     मी तर तुझ्या दिलाचा मजनू.

ते स्वप्न होत की सत्य
तो भास होता की वस्तुस्थिती
प्रत्यक्षात तसं घडलं होत
तू मला साक्षात पाहिलं होतं
     नजरानजर झाली मग दोघांची
     देवाणघेवाण झाली अबोल शब्दांची
     पाहता पाहता मनही जुळले,
     नशिबानेच हे सर्वकाही घडवले. 

भेटीगाठी मग होतं राहिल्या
वचने एकमेका देत्या झाल्या
प्रेम पायरी चढत राहिले
आम्ही एकमेका मनाने वरले
     नशिबानेच आमची भेट घडवली
     नशिबानेच आमची मनेही जुळवली
     नशिबावरच आहे आमचा विश्वास,
     नशिबानेच आम्हा साथ दिली.

तू माझा झालास, अन मी तुझी
हा सर्व खेळ होता नशिबाचाच
नशिबाचे मजवर उपकार आहेत
आता तू आहेस माझाच
     नशिबावरच विसंबून आहोत आजही
     नशिबानेच मिळालंय आम्हा सर्वकाही
     नशिबाने आम्हा एक केलंय,
     नशिबाने आमचं जीवन घडवलंय.

नशिबाची साथ मला मिळाली
नशिबानेच मला तू मिळालास
बाकी मी काही जाणत नाही,
ऋणी नशिबाची मी सख्या राही.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.01.2023-शनिवार. 
=========================================