खट्याळ-मिष्कील-प्रेम-कविता-गीत-माझ्या समोरील खिडकीतून रोज, एक हसरा चेहरा डोकावतो

Started by Atul Kaviraje, January 21, 2023, 05:41:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, खट्याळ-मिष्कील-प्रेम-कविता-गीत ऐकवितो. "मेरे सामने वाली खिड़की में, एक चांद का टुकड़ा रहता है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही सांज-शनिवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (मेरे सामने वाली खिड़की में, एक चांद का टुकड़ा रहता है)
--------------------------------------------------------------------

              "माझ्या समोरील खिडकीतून रोज, एक हसरा चेहरा डोकावतो"
             ------------------------------------------------------

माझ्या समोरील खिडकीतून रोज,
एक हसरा चेहरा डोकावतो
इतका सतेज तो असतो,
की मज जणू शशीच तो भासतो.

माझ्या समोरील खिडकीतून रोज,
एक हसरा चेहरा डोकावतो
इतका सुंदर तो असतो,
की मज जणू चंद्रची तो भासतो.

रोज दिसतो, पुन्हा दिसेनासा होतो
जणू चंद्रच ढगाआड लपतो
वाटत माझ्याशी लपंडाव खेळतो,
की तो मला चिडवून दाखवतो ?

जेव्हापासून तो चेहरा दिसलाय
तेव्हापासून मी माझा मूडच गमावलाय
असं वाटत तो मला वाकुल्या दाखवतो,
असं वाटत तो मला खिजवून दाखवतो.

तरी माझं मन मला म्हणतंय
की तो पुन्हा पुन्हा दिसावा
त्यासाठी थांबण्याचीही आहे तयारी,
की तो चंद्र एकदा पुन्हा उगवावा.

तो दिसण्यास मी इथे झुरतो
तो पाहण्यास मी पहा मारतो
पण हा चंद्र अति चंचल कसा,
खट्याळपणे मला कोपरखळीच मारतो.

पाऊस केव्हाचा येऊन गेला
ढग केव्हाच बरसून गेला
वीज केव्हाची चमकून गेली,
पण त्या चंद्राची झलक नाही दिसली.

तीच पाहण्यास मी पहा झुरतो
तिचं दर्शन होण्या मी तळमळतो
पण अति खोडकर कसा चंद्र पहा,
माझ्याशी चक्क लपंडावच खेळतो.

तो चेहरा सतत यावासा वाटतो
खिडकीतून पुन्हा पुन्हा डोकवावासा वाटतो
माझ्या नयनांना तिचं आस आहे,
डोळ्यांनी पुन्हा पुन्हा तो पहावासा वाटतो.

कधी वाटतं तो माझ्याशी बोलेल
कधी वाटतं तो खुदकन हसेल
याचा आशेवर मी खिडकीत उभा असतो,
त्या चंद्राची रोज मी वाट पाहतो.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.01.2023-शनिवार. 
=========================================