जीवन-आयुष्य प्रेम कविता-गीत-तू आलास माझ्या जीवनी, प्रकाशमय झाली माझी रजनी

Started by Atul Kaviraje, January 22, 2023, 06:10:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, जीवन-आयुष्य प्रेम कविता-गीत ऐकवितो. "तुम आ गये हो, नूर आ गया है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही संध्या-रविवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (तुम आ गये हो, नूर आ गया है)
---------------------------------------------

                 "तू आलास माझ्या जीवनी, प्रकाशमय झाली माझी रजनी"
                -------------------------------------------------

अंधारमय जीवन माझे राजसा
प्रकाशाचा आणत हलकासा कवडसा
जीवन माझे उजळून टाकलेस,
देत मला आपलासा दिलासा.

पणती माझी मंदावली होती
तिची वात विझत होती
येऊन तू दिवा लावलास,
सतत तो तेवत ठेवलास.

मला जगण्याची आस मिळाली
तुझी साथ मला लाभली
जीवनी माझ्या आभा आली,
तुझ्यामुळेच ही प्रभा फाकली.

भरकटलेले माझे जीवन सख्या
वाट फुटेल तिथे जात होते
माझा हमसफर होऊन आलास,
माझा हात हाती घेतलास.

सुरुवात नव्हती, शेवटच माहीत नव्हता
रस्ता सारा सुनसान, निर्जन होता
येऊन मला वाट दाखवलीस,
माझ्या वाटेवर फुले उधळलीस.

पावले चालत होती एकटी
थकले होते, दमले होते
पावलावर माझ्या पाऊल होते,
हात तुझे सहारा देत होते.

हा प्रवास निरंतर होता
हा प्रवास अनंत होता
तेव्हा मला धीर देत,
लाडक्या, तूच माझ्यासह होतास.

हाकेला माझ्या प्रतिसाद मिळाला
तुझ्या प्रतीक्षेत होते केव्हापासून
आज प्रतीक्षा पूर्ण झाली,
तुझ्यामुळे जीवन पूर्तता झाली.

डोळ्यात तुझेच स्वप्न होते
ओठावर तुझेच नाव होते
येऊन माझे स्वप्न पूर्ण केलेस,
जीवन माझे परिपूर्ण झाले.

तू आलास माझ्या जीवनी,
प्रकाशमय झाली माझी रजनी
तू आलास माझ्या आयुष्यात,
बनून एक सुंदर पहाट.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.01.2023-रविवार. 
=========================================