२२-जानेवारी-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, January 22, 2023, 10:11:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०१.२०२३-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "२२-जानेवारी-दिनविशेष"
                                 -----------------------

-: दिनविशेष :-
२२ जानेवारी
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००१
आय. एन. एस. मुंबई
'आय. एन. एस. मुंबई' ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली.
१९९९
ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.
१९७१
सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४७
भारतीय घटनेची रुपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर
१९२४
रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.
१९०१
राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९३४
विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
(मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)
१९२०
प्रा. हरी श्रीधर शेणोलीकर – मध्ययुगीन मराठी वाङ्‌मयाचे व संतसाहित्याचे साक्षेपी अभ्यासक अभ्यासक. त्यांचे नामदेव गाथा (संपादित), नाम्याची अमृतवाणी, प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप, मराठी संतवाणीचे मंत्राक्षरत्व, मराठी संत-तत्त्वज्ञान संज्ञाकोश इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत.
(मृत्यू: ८ जुलै २००३)
१९१६
सत्येन बोस – बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक, बरजात्री [१९५१ - बंगाली], जागृती [१९५४],चलती का नाम गाडी [१९५८], दोस्ती [१९६४], मेरे लाल [१९६६], रात और दिन [१९६७], आंसू बन गये फूल [१९६९], जीवन मृत्यू [१९७०] हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
(मृत्यू: ९ जून १९९३)
१९१६
हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी
(मृत्यू: १५ जानेवारी १९९४)
१९०९
यू. थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस
(मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७४)
१५६१
सर फ्रँन्सिस बेकन – इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी
(मृत्यू: ९ एप्रिल १६२६)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१९७८
हर्बर्ट सटक्लिफ – इंग्लिश क्रिकेटपटू
(जन्म: २४ नोव्हेंबर १८९४)
१९७५
'काव्यविहारी' धोंडो वासुदेव गद्रे – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी
(जन्म: १६ नोव्हेंबर १८९४)
१९७३
लिंडन बी. जॉन्सन – अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २७ ऑगस्ट १९०८)
१९७२
स्वामी रामानंद तीर्थ
व्यंकटेश भगवानराव खेडगीकर तथा स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ
(जन्म: ३ आक्टोबर १९०३)
१९६७
डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे – क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि 'गदर पार्टी' चे शिल्पकार
(जन्म: ७ नोव्हेंबर १८८४)
१९०१
व्हिक्टोरिया – इंग्लंडची राणी, हिने ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य केले. हिच्या कारकिर्दीत इंग्लंडच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसे अशी ख्याती होती. व्हिक्टोरिया राणीच्या काळातच भारत इंग्लंडचा गुलाम झाला.
(जन्म: २४ मे १८१९)
१७९९
ऑस्ट्रियन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक
(जन्म: १७ फेब्रुवारी १७४०)
१६८२
नारायण सूर्याजीपंत ठोसर (कुलकर्णी) तथा समर्थ रामदास स्वामी
(जन्म: ? ? १६०८)
१६६६
५ वा मुघल सम्राट शहाजहान याचे आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) कैदेत १० वर्षे राहिल्यानंतर निधन
(जन्म: ५ जानेवारी १५९२)
१२९७
योगी चांगदेव समाधिस्थ
(जन्म: ? ? ????)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.01.2023-रविवार.
=========================================