पांथस्थ कविता-गीत-पांथस्थ मी या वाटेवरचा, अंतहीन अश्या दाही दिशांचा

Started by Atul Kaviraje, January 23, 2023, 03:55:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, पांथस्थ कविता-गीत ऐकवितो. "पंथी हूँ मैं उस पथ का, अंत नहीं जिसका"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही दुपार-सोमवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (पंथी हूँ मैं उस पथ का, अंत नहीं जिसका)
-----------------------------------------------------

                   "पांथस्थ मी या वाटेवरचा, अंतहीन अश्या दाही दिशांचा"
                  ------------------------------------------------

पांथस्थ मी या वाटेवरचा,
अंतहीन अश्या दाही दिशांचा.

पांथस्थ मी या वाटेवरचा,
अंतहीन अश्या दाही दिशांचा
वाट संपत नाही, दिशा सरत नाही,
दिशाहीन मुशाफीर मी पथावरचा.

पांथस्थ मी या वाटेवरचा,
अंतहीन अश्या दाही दिशांचा
या दिशाच माझ्या आहेत आशा,
जरी रस्ता असला निराशेचा.

पांथस्थ मी या वाटेवरचा,
अंतहीन अश्या दाही दिशांचा
नजरेत आहे ती मंजिल,
जिथे किरण दिसेल आशेचा.

पांथस्थ मी या वाटेवरचा,
अंतहीन अश्या दाही दिशांचा
कधी उजेड, तर कधी अंधार,
आधार देताहेत मज मित्रत्त्वाचा.

पांथस्थ मी या वाटेवरचा,
अंतहीन अश्या दाही दिशांचा
माझा विवेक दाखवी मार्ग मज,
सहज सोडवूनी गुंता विचारांचा.

पांथस्थ मी या वाटेवरचा,
अंतहीन अश्या दाही दिशांचा
आकाशस्थ तारे आहेत माझे मार्गस्थ,
अन आकाशाच्या गहन निळाईचा.

पांथस्थ मी या वाटेवरचा,
अंतहीन अश्या दाही दिशांचा
अनुभव आला कधी सुखाचा,
तर कधी न सरत्या दुःखांचा.

पांथस्थ मी या वाटेवरचा,
अंतहीन अश्या दाही दिशांचा
आनंदाची कधी वेचिलीं फुले,
तर वाटेकरी कधी काटेरी दुःखांचा.

पांथस्थ मी या वाटेवरचा,
अंतहीन अश्या दाही दिशांचा
प्रवास कोठपर्यंत ठाऊक नाही,
आयुष्य असेपर्यंत फक्त चालण्याचा.

पांथस्थ मी या वाटेवरचा,
अंतहीन अश्या दाही दिशांचा.

पांथस्थ मी या वाटेवरचा,
अंतहीन अश्या दाही दिशांचा
वाट संपत नाही, दिशा सरत नाही,
दिशाहीन मुशाफीर मी पथावरचा.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.01.2023-सोमवार. 
=========================================