मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-189

Started by Atul Kaviraje, January 23, 2023, 08:38:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                मला आवडलेल्या चारोळ्या
                                  चारोळी क्रमांक-189
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं-चारोळीकार  आज  काहीतरी  वेगळे  दाखविण्याचा  प्रयत्न  करतोय . त्याने  आज  चक्क  एक  शृंगारिक  लावणी  लिहिली  आहे . या  चारोळीतून  तो  त्या  प्रियकराच्या  प्रेयसीची  शृंगारिक  अदा  या  शृंगार  चारोळीतून  आपणापुढे  मांडत  आहे . प्रियकर  तिला  म्हणतोय , की  मी  तर  तुला  रोजच  पाहतो . परंतु  तू  मला  आज  काही  वेगळीच  भासत  आहेस . आज  तू  मला  शृंगाराची  खाण , खजिना  वाटत  आहेस . तुझा  नयन-बाण  माझं  दिल  छेदून  आरपार  जात  आहे , असं  मला  वाटतंय . तुझी  नजर  खाली  झुकलीय , आणि  तुझा  कटीवरील  हात  किंचित  खाली  आलाय . तूझ्या  ओठांवरली    लाली  ही  स्पष्टपणे  चमकत  आहे .तू  अशी  काही  नटली  आहेस , की  कोणतीही  नटी  तुझ्यापुढे झक  मारावी . हे  सर्व  पाहून  माझा  जीव , माझं  मन  तुला  भेटण्यास  फार  उतावीळ   होत  आहे . तुझे  ते  मधाळ, रसरसलेले ओठ , आणि  त्यावर  तुझे  ते  गोरेपान  बोट  ठेवून  मला  तू  काहीतरी  इशारा  करीत  आहेस .  तुझा  पैंजणाचा  मधुर  असा  नाद  सर्वत्र  घुमत  आहे . तुझी  चाल  एखाद्या  वाघिणीसामान  मला  भासत  आहे , आणि  तुझी  मान  एखाद्या  वळवळत्या  नागिणीप्रमाणे  डुलत  आहे , झुलत  आहे . अश्या  सौंदर्याची  तू  सम्राज्ञी  माझी  प्रेयसी  आहेस , याचा  मला  फार  अभिमान  वाटतो .

==========================
🌹🌹रोजच पाहतो तुझा चेहरा, आज वाटे नवीन काही..
शृंगाराची खान तुझी
नजरेचा बाण घायाळ करी..
कमरेवरचा हात तुझा
नजर झुकवित किंचित खाली..
ओठावरती चमकते लाली
हा शृंगार कुणासाठी..
नटली अशी जणू भासते नटी..
उतावीळ झाला जीव
तुला भेटण्यासाठी..
मधाळ तुझे ओठ
त्यावर ठेवून अलगद बोट..
इशारा करशी मज काही
पैंजणांचा नाद मधुर..
असा वाजतो तुझ्या पायी
चाल तुझी जणू चालली वाघीण..
डुलते मान जशी डुलती नागिन." 💘
==========================

--नवं-चारोळीकार
----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.01.2023-सोमवार.
=========================================