मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-102-सुभाष चंद्र बोस जयंती

Started by Atul Kaviraje, January 23, 2023, 08:49:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-102
                                 ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "सुभाष चंद्र बोस जयंती"

     आज दिनांक 23 जानेवारी 2023, भारतीय स्वतंत्र लढ्यात महत्वपूर्ण योगदान देणारे क्रांतिकारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा हा जन्म दिवस. आज आपण नेताजींनी 124 वी जयंती साजरी करीत आहोत. ओडिसा मधील कटक शहरातले प्रसिद्ध वकील जानकी नाथ बोस व प्रभावती देवी यांच्या घरी सुभाष चंद्र बोस 23 जानेवारी 1897 ला जन्माला आले. त्यांचे प्रारंभिक शिक्षण कटक मध्येच झाले. उच्च शिक्षणासाठी ते कोलकत्ता विश्व विद्यालयात पोहोचले. कोलकत्यात त्यांनी 1919 मध्ये प्रथम श्रेणीत बी ए ची परीक्षा उत्तीर्ण केली.

     नेताजींच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी सरकारी नोकरी करावी. आपल्या वडिलांची इच्छा म्हणून नेताजींनी आयएएस ची परीक्षा दिली व या परीक्षेत त्यांनी चौथा क्रमांक मिळवला. परंतु देशाला गुलामीतून मुक्त करण्याची भावना नेताजींच्या मनात लहानपणापासून ठसलेली होती. त्यांनी एक वर्षाच्या आतच आपल्या नोकरी चा राजीनामा दिला. आणि देशाच्या स्वतंत्र कार्यात लागून गेले.

     1941 साली नेताजी जर्मनी जाऊन अडोल्फ हिटलर ला भेटले व भारतीय स्वातंत्र्यासाठी मदत मागितली. भारतातून इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी आझाद हिंद फौज ची स्थापना केली. त्यांनी तरुणांना आव्हान केले की "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दुंगा". या नंतर 1943 मध्ये नेताजी जपान च्या मदतीने सिंगापूर ला पोहोचले. सिंगापूर मध्ये मोहन सिंह द्वारे बनवलेली इंडियन नॅशनल आर्मी ची कमान आपल्या हाती घेतली. सुभाष चंद्र बोस यांनी सिंगापूर मधून रेडिओ वर संबोधन करताना गांधीजींना पहिल्यांदाच भारताचे राष्ट्रपिता म्हणून सन्मान दिला.

     सुभाष चंद्र बोस यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या भाषणात देशाच्या जनतेला एक संदेश दिला होता. या भाषणात त्यांनी म्हटले होते "बंधू आणि भगिनींनो देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण जे युद्ध सुरू केले आहे, याला तोपर्यंत सुरू ठेवा जोपर्यंत भारत स्वतंत्र होत नाही. धर्म पंथ आणि जात पात विसरून एकत्रित व्हा.

     साल 20 जुलै 1921 मध्ये नेताजींनी महात्मा गांधीची भेट घेतली व वेगवेगळ्या सामाजिक कार्यात सहभाग घेत राहिले. या दरम्यान एकदा बंगाल मध्ये महापूर आला. नेताजींनी शिबिरे लावून प्रभावित लोकांना जीवनावश्यक वस्तू वाटणे सुरू केले. समाजसेवेच्या या कार्यासाठी त्यांनी 'युवक दलाची' स्थापना केली.

     ज्यावेळी भगत सिंह यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हा नेताजी गांधीजी कडे गेले व त्यांनी भगत सिंह यांची शिक्षा रद्द करण्यासाठी आंदोलनाची विनंती केली. परंतु महात्मा गांधीनी त्याच्या या विनंती कडे दुर्लक्ष केले. या प्रसंगामुळे ते गांधीजी व काँग्रेस च्या कार्यपद्धतीने नाराज झाले.

     सुभाष चंद्र बोस यांनी 'दिल्ली चलो' चा नारा दिला. परंतु 18 ऑगस्ट 1945 मध्ये एका हवाई दुर्घटने दरम्यान त्याची मृत्यू झाली. नेताजींच्या मृत्युनंतर त्यांच्या शरीर सापडले नाही यामुळे त्यांच्या मृत्युच्या कारणावर आज देखील विवाद सुरू आहेत. परंतु या सर्वांमध्ये ही गोष्ट सत्य की आज जी आपण जय हिन्द ची घोषणा करतो, हे घोषवाक्य देखील नेताजींनी दिले आहे. जय हिंद जय भारत.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                    -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.01.2023-सोमवार.
=========================================