प्रेम-कविता-गीत-मी नाही प्रेम करणार कधी, मी नाही प्रेमात पडणार कधी !

Started by Atul Kaviraje, January 23, 2023, 09:14:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेम-कविता-गीत (वेगळ्या अर्थाने) ऐकवितो. "ये जो मुहब्बत है, ये उनका है काम"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही निशा-सोमवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (ये जो मुहब्बत है, ये उनका है काम)
-------------------------------------------------

              "मी नाही प्रेम करणार कधी, मी नाही प्रेमात पडणार कधी !"
             ----------------------------------------------------
         
मी नाही प्रेम करणार कधी,
मी नाही प्रेमात पडणार कधी !

मी नाही प्रेम करणार कधी,
मी नाही प्रेमात पडणार कधी !
ही चूक मी नाही करणार कधी,
प्रेमात पडण्याची भूल नाही करणार कधी !

प्रेमात फक्त तेच पडतात
जे प्रेमाचे वादे निभावतात
प्रेमात फक्त तेच पडतात
जे शेवटपर्यंत प्रेम निभावतात
     माझं तसं नाहीय मित्रांनो
     प्रेमात ठरलोय मी बदनाम
     बदनाम झालो होतो याही आधी,
     मी नाही प्रेमात पडणार कधी !

मित्रांनो जाऊ दे ना
मला आग्रह करू नका ना
प्रेमात पडणे माझा पिंड नाही
मला प्रेम करणे जमणार नाही
     प्रेमात शपथा देता नाही येत
     प्रेमाचे वादे नाही करता येत
     प्रेमात सफल नाही झालोय कधी,
     मी नाही प्रेमात पडणार कधी !

प्रयत्न केला होता एकदा
प्रेमात स्वतःला झोकून देण्याचा
पण पडता पडता तोलच गेला
माझ्या मनाचा तोल बिघडला
     कदाचित कुणीतरी माझं मन मोडलं
     कदाचित कुणीतरी माझं हृदय तोडलं
     तोडलेलं जोडलं नाही गेलं कधी,
     मी नाही प्रेमात पडणार कधी !

आता मी डोळे भिडविण्यासही घाबरतो
आता मी तिच्याशी बोलतानाही दचकतो
घरापुढूनही जाताना अवचित मी
तिच्या खिडकीकडे बघणंही टाळतो
     एकदा असफल झालेला पुन्हा
     प्रेम करण्याचा नाही करीत गुन्हा
     वाटतंय प्रेमाचाच मी आहे अपराधी,
     मी नाही प्रेमात पडणार कधी !

प्रेम न करणं माझ्या हिताचं ठरलंय 
प्रेम न करण्याने माझं भाग्य बदललंय   
ते माझ्या पथ्यावरच पडलंय
प्रेम न करण्यानेच माझं आयुष्य घडलंय
     आता मी एकटा आहे सुखी
     आता मी एकटा आहे आनंदी
     प्रेम करणं मला जमलंच नाही कधी,
     मी नाही प्रेमात पडणार कधी !

मी नाही प्रेम करणार कधी,
मी नाही प्रेमात पडणार कधी !

मी नाही प्रेम करणार कधी,
मी नाही प्रेमात पडणार कधी !
ही चूक मी नाही करणार कधी,
प्रेमात पडण्याची भूल नाही करणार कधी !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.01.2023-सोमवार. 
=========================================