आपले-परके करणारे-दु:खी गीत(SAD-SONG)माझा नव्हता कुणी इथे, परकेच होते सारे तिथ !

Started by Atul Kaviraje, January 23, 2023, 10:03:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, आपले आणि परके भेद करणारी एक दु:खी कविता-गीत (SAD-SONG) ऐकवितो. "जाने अनजाने लोग मिले,मगर कोई मिला न अपना"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही निशा-सोमवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (जाने अनजाने लोग मिले,मगर कोई मिला न अपना)
-------------------------------------------------------------

                     "माझा नव्हता कुणी इथे, परकेच होते सारे तिथे"
                    ------------------------------------------

माझा नव्हता कुणी इथे,
परकेच होते सारे तिथे !

माझा नव्हता कुणी इथे,
परकेच होते सारे तिथे !
अनोळखी, ओळखीचे सारे होते,
पण आपला नव्हता कुणी तिथे !

वाटलं भेटतील आपले कुणीतरी
जास्त नाही तर एखादातरी
पण ते सारे परके निघाले,
माझा नव्हता कुणी तिथे !

तिथे असा कुणीच नव्हता
दुःख माझे हलके करणारा
तिथे आपला कुणीच नव्हता,
जखमांवर माझ्या औषध लावणारा.

निदान दिलासा तरी मिळेल
असं मला वाटल होत
निदान कुणी तरी बोलेल,
असं मला वाटल होत.

दर्दभरी होती माझी कहाणी
दुःखभरी होती माझी गाणी
ऐकून सारे निघून गेले,
सांत्वना देण्या कुणी नाही थांबले.

कधी आशेवर झुलत होतो
कधी निराशेवर हिंदकळत होतो
थांबून सारे पहात होते,
मनाचे दुःख कुणी विचारीत नव्हते.

त्यांचा तरी काय दोष
नशिबानेच पाठ फिरवलीय जिथे
त्यांना बोलून काय फायदा,
आपल्यानीच पाठ दाखवलीय जिथे.

माझे हास्य कुणीतरी चोरलंय
माझे शब्द कुणीतरी हिरावलेत
माझ्या हास्यात उणीव असते,
माझ्या शब्दात कणव असते.

अश्रूंनी मला साथ केलीय
जिथे आपल्यांची गरज होती
अश्रूंनी मला सोबत केलीय,
जिथे माझी माणसे हवी होती.

माझा नव्हता कुणी इथे,
परकेच होते सारे तिथे !

माझा नव्हता कुणी इथे,
परकेच होते सारे तिथे !
अनोळखी, ओळखीचे सारे होते,
पण आपला नव्हता कुणी तिथे !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.01.2023-सोमवार. 
=========================================