लोकं-वर्तनावर गंभीर कविता-गीत-लोकांना काय जातंय बोलायला, तुला पटतं तेच तू कर !

Started by Atul Kaviraje, January 25, 2023, 10:39:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, लोकं-वर्तनावर एक गंभीर कविता-गीत ऐकवितो. "कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही निशा-बुधवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना)
---------------------------------------------------------

                  "लोकांना काय जातंय बोलायला , तुला पटतं तेच तू कर !"
                 --------------------------------------------------

लोकांना काय जातंय बोलायला,
तुला पटतं तेच तू कर !
लोकं तुला काहीही म्हणोत,
तू तुझ्या मनाचच कर !

लोकांकडे दुर्लक्ष कर तू
मनावर नको घेऊस त्यांचे बोलणे
कानाडोळा कर त्यांचेकडे तू,
लादून घेऊ नकोस त्यांचे म्हणणे.

पहा सगळे ऋतू सरतील
त्यांचेकडे लक्ष देऊन नकोस
जीवनाचा आनंद ते हिरावतील,
त्यांचेकडे तू पाहूही नकोस.

रोज सकाळनंतर संध्याकाळ येईल
अन सायंकाळनंतर निशेचे आगमन होईल
दिवस-रात्रीचे चक्र तू पहIत राहा,
मनाला दिलासा देत राहा.

आपली काय पत्रास येथे
आपल्याला कुणीही विचारीना इथे
अस्तित्त्वच भंगलेलं आपलं अस्तित्त्व,
कुणाला पडलंय आपलं इथे ?

कितीसा पुरा पडणार आहेस तू ?
काय काय करणार आहेस तू ?
तुझे प्रयत्न कमी पडतील तिथे,
आणि कुणाचे आसू पुसणार आहेस तू ?

लोकांनी तुला आजवर हेटाळलंय
इतरांनी तुला पाण्यात पाहिलंय
साऱ्यांना हे कधीच पहावल नाही,
तुला हसताना पाहून त्यांनी तोंड फिरवलंय.

तेच ते करीत होते
जे तू अपेक्षिले होते
पण जाणूनबुजून साऱ्यांनी तुला,
मुद्दामूनच ठरवून उपेक्षिले होते.

खरं काय नी खोटं काय ?
हे फक्त तूच जाणतोस
बोटे रोखणचं लोकांना जमतं,
त्यांना दुसरं काय काम असतं ?

तू लोकांच काहीही ऐकू नकोस
त्यांचे विचार लादून घेऊ नकोस
ते काहीही बोलोत, म्हणोत,
तू त्यांचं मनावर घेऊ नकोस.

लोकांना काय जातंय बोलायला,
तुला पटतं तेच तू कर !
लोकं तुला काहीही म्हणोत,
तू तुझ्या मनाचच कर !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.01.2023-बुधवार.
=========================================