II २६ जानेवारी-प्रजासत्ताक दिन II-कविता-6

Started by Atul Kaviraje, January 26, 2023, 11:13:11 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II २६ जानेवारी-प्रजासत्ताक दिन II
                             -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२६.०१.२०२३-गुरुवार. आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन.
२६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रीस प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकुया, या दिवसाच्या काही कविता.

                                  "26 जानेवारी-पोवाडा"
                                 ---------------------

धन्य,धन्य भारताला

26जानेवारीला

प्रजासत्ताक या दिनाला

सार्वभौम भारत देशाला जी जी जी


पोवाडा राष्ट्रीय सणास

गाऊन महिमा खास

आठवण भारत देशास

समता,बंधुता,देशास जी जी जी


प्रजासत्ताक 26 जानेवारीला

आदर तिरंगा झेंड्याला

सलाम करून ध्वजाला

गाऊन राष्ट्रगीत देशाला जी जी जी


प्रजासत्ताक 26 जानेवारी दिन

लिहिला आहे सुवर्ण अक्षरान

क्रांतीकारकांची आठवण

शहिद वीर जवानांचे स्मरण जी जी जी 


प्रजासत्ताक एक इतिहास

भारतास कायदा खास

मिळाला भारतीय नागरिकांस

अनमोल खजिना देशास जी जी जी


राष्ट्रीय एकता,एकात्मता

पाळावी देशात समानता

राखावी देशाची अखंडता

याचा स्वीकार करूनी स्वत:जी जी जी


काळ दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसाचा

अभ्यास पूर्ण झाला संविधानाचा

26 जानेवारी 1950 सालाचा

मुहूर्त ठरला भारतीय संविधानाचा जी जी जी


धर्मनिरपेक्ष समाजवादी भारत

गणराज्य भारत देशात

विचार,अभिव्यक्ती नागरिकांत

सार्वभौम जनतेच्या हातात जी जी जी


प्रजासत्ताक स्वातंत्र्य देशाला

याची आठवण 26 जानेवारीला

कायदा देशात राबविला

न्याय मिळाला माणसा माणसाला जी जी जी


प्रगतीची वाटचाल देशास

संवर्धन ऐतिहासिक वास्तूंचे खास

भारताचे रक्षण असावा ध्यास

आदर्श भारत घडविण्यास जी जी जी


पं.जवाहरलाल नेहरु पंतप्रधान

सरदार वल्लभ भाई पटेल गृहमंत्री आठवण

डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार संविधान

डॉ.राजेंद्र प्रसाद समिती अध्यक्ष संविधान जी जी जी


स्वतंत्र भारताचा प्रजासत्ताक दिन

गाथा शूरवीरांची स्मरूण

गाऊन अभिमानाने गुणगान

व्हावे गावागावात संचलन जी जी जी


शाहिराने साज चढविला

26 जानेवारी दिवसाला

राष्ट्रभक्ती एकोपा जपण्याला

स्फूर्ती घ्यावी देश विकासाला जी जी जी

--संजय रघुनाथ सोनावणे
---------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                     -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2023-गुरुवार. 
=========================================