II २६ जानेवारी-प्रजासत्ताक दिन II-शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, January 26, 2023, 11:14:59 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II २६ जानेवारी-प्रजासत्ताक दिन II
                             -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२६.०१.२०२३-गुरुवार. आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन.
२६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रीस प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकुया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

     26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण त्याची लोकशाहीची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आणली गेली. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून प्रजेची सुरुवात झाली म्हणून हा प्रजात्ताक दिन आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेकांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व अद्याप माहीत नाही. जर तुम्हाला याचे महत्व लोकांना जाणवून द्यायचे असेल तर तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Republic Day Wishes In Marathi) संदेश पाठवू शकता आणि या दिवसाचे महत्व अधोरेखित करु शकता. देशभक्ती जागृत करण्यासाठी देशभक्तीपर चित्रपट ही तुम्ही पाहू शकता. 2022 सालातील प्रजासत्ताक दिनालाही तुमच्या जवळच्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (republic day wishes in marathi) नक्की द्या.

--स्वतंत्र्यता घेण्याचे नाही तर देण्याचे नाव आहे – नेताजी शुभाष चंद्र बोस

--चुका करण्याची मुभा आपल्याला नसेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले नाही – महात्मा गांधी

--या.. आपण सगळ्यांनी मिळून शांति, सद्भाव आणि प्रेमाने यात्रा सुरु करुया – अटल बिहारी वाजपेयी

--हम पहले और आखिर में सिर्फ भारतीय हैं – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

--नागरिकता देशाच्या सेवेसाठी वाहून घेतली पाहिजे – पंडीत जवाहरलाल नेहरु

--न्याय आणि व्यवस्था हे राजकारणाचे महत्वाचे भाग आहेत. यापैकी एकही भागाला दुखापत झाली तरी औषध हे करावेच लागते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

--नव्या संविधानांतर्गत काही चुकीचे होत असेल तर याचा असा अर्थ नाही की संविधान चुकीचे आहे.. यामध्ये माणसाचे काहीतरी चुकत आहे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

--प्रजासत्ताकचा अर्थ एक राष्ट्र, एक भाषा आणि एक झेंडा – एलेग्जेंडर हेनरी

--कोणत्याही राष्ट्राची संस्कृती ही तेथील लोकांच्या आत्मा आणि मनात वसलेली असते – महात्मा गांधीचे अनमोल विचार

--सहिष्णुता आणि स्वतंत्रता हा प्रजासत्ताकाचा मजबूत पाया आहे – फ्रैंक लॉयड राइट

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठी.पॉप xo.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2023-गुरुवार. 
=========================================