II २६ जानेवारी-प्रजासत्ताक दिन II-शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, January 26, 2023, 11:16:41 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II २६ जानेवारी-प्रजासत्ताक दिन II
                             -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२६.०१.२०२३-गुरुवार. आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन.
२६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रीस प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकुया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

--पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

--देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वत:ला विचारा... प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

--आपल्या पूर्वजांनी आपल्याला चांगला इतिहास दिला आहे... तुम्ही तो इतिहास कायम जागा ठेवा... प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

--आपल्या देशात विविधता आहे आणि ती तशीच कायम टिकवून राहावे. देशातील सलोखा वाढावा. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

--परिवर्तनाचे नेतृत्व करा आणि देशातील शांतता टिकवून ठेवा.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023.

--आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत... मला आशा आहे की, हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

--गर्वाने बोला भारतीय आहे मी.... प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2023 !

--उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,  नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला... प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

--बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो. समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

--देश विविध रंगाचा,ढंगाचा.. विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

--चला आपल्या देशाच्या वीर जवानांना आठवूया, त्यांनी दिलेल्या बलिदानाला आठवूया, सलाम सर्व वीरांना. प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश

--ना हिंदू, ना मुसलमान फक्त माणूस बना माणूस. मानवता हाच धर्म माना. वंदे मातरम, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

--देशभक्तीपर गीते, ज्यांनी केला जातो 'स्वातंत्र्य दिन' साजरा

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठी.पॉप xo.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2023-गुरुवार. 
=========================================