II २६ जानेवारी-प्रजासत्ताक दिन II-शुभेच्छा-5

Started by Atul Kaviraje, January 26, 2023, 11:22:00 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II २६ जानेवारी-प्रजासत्ताक दिन II
                             -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२६.०१.२०२३-गुरुवार. आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन.
२६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रीस प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकुया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

1. मातृभूमी ही अजिंक्य.. विश्वात साऱ्या वंद्य संस्कृती ,
कण कण मातीचा बोले हर्षे, विश्वास प्रेम इथे नांदती
संपन्न इतिहास अन, युवकात प्रखर राष्ट्रप्रेम जागृती
हर मनात हृदयात अन, हुंकार एकमेव जय भारती ||

--सचिन कुलकर्णी
----------------

2. असा भारत हवाय ... जिथे सगळ्यांची जास भारतीय असेल
धर्म देश प्रेम उच्च नीच भेदभाव सीमा पार असेल
नातं असेल भारतीयत्वाचा...
सुख शांती समाधान मिळेल
शत्रूचा थरकाप उडवील.. एवढी विचारांना धार असेल
प्रत्येक भारतीयाचा अन्यायावर होणारा वार असेल
जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात भारताविषयीचा आदर असेल

3.  पोहायचे असेल तर समुद्रात पोहा
नदी नाल्यात पोहण्यात काय अर्थ आहे
प्रेम करायचे असेल तर देशावर करा
कारण लोकं फसवतील पण देश तुम्हाला कधीही फसवणार नाही

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठी.पॉप xo.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2023-गुरुवार. 
=========================================