II २६ जानेवारी-प्रजासत्ताक दिन II-कविता-8

Started by Atul Kaviraje, January 26, 2023, 11:27:52 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II २६ जानेवारी-प्रजासत्ताक दिन II
                             -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२६.०१.२०२३-गुरुवार. आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन.
२६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रीस प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकुया, या दिवसाच्या काही कविता.

घडतोय बदल
चढतेय वीटेवर वीट
मिटतेय गुलामी
आपण होतोय धीट
उठत आहेत प्रश्न
कुरवाळतोय शंका
अन्यायाविरुद्ध
कुणी वाजवतोय डंका
पसरतेय महिती
हक्कासाठी भांडतोय
उलट सुलट का होईनात
आपण विचार मांडतोय
घडवितोय देश आपला
अंतराळी इतिहास
उद्याच्या चैतन्यावर
दृढ होतोय विश्वास
कोपर्‍यातल्या झोपडीमध्ये
प्रगतीची इच्छा दिसतेय
पुस्तकाच्या बाजारातही
आशेची पालवी रुजतेय
भारतीय असण्याचा वाटे
मनापासून अभिमान
बलाढ्य सुंदर समृद्ध स्वतंत्र
माझा भारत देश महान

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठी.पॉप xo.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2023-गुरुवार. 
=========================================