२६-जानेवारी-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, January 26, 2023, 08:34:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२६.०१.२०२३-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "२६-जानेवारी-दिनविशेष"
                                  -----------------------

-: दिनविशेष :-
२६ जानेवारी
भारतीय प्रजासत्ताक दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००१
गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे २०,००० लोक ठार झाले.
१९९८
कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना 'पद्मविभूषण' पुरस्कार प्रदान
१९७८
महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू
१९५०
भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.
१९५०
एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४२
दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दन आयर्लंड येथे आगमन
१९३३
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सूरुवात केली. स्वातंत्र्यदिन साजरा केल्याने देशात धरपकड झाली. पुढे प्रत्यक्षात १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल्याने २६ जानेवारी १९५० या दिवशी प्रजासत्ताक राज्यपध्दती स्वीकारली जाऊन तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होऊ लागला.
१९२४
रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे लेनिनग्राड असे नामकरण करण्यात आले.
१८७६
मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.
१८३७
मिचिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले.
१६६२
लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया
१५६५
विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९५७
शिवलाल यादव – क्रिकेटपटू
१९२५
पॉल न्यूमन – अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर
(मृत्यू: २६ सप्टेंबर २००८)
१९२१
अकिओ मोरिटा
अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे सहसंस्थापक
(मृत्यू: ३ आक्टोबर १९९९ - तोक्यो, जपान)
१८९१
'चंद्रशेखर' शिवराम गोर्‍हे – बडोद्याचे राजकवी, 'गोदागौरव' आणि 'कविता रति' ही त्यांची विशेष गाजलेली काव्ये आहेत.
(मृत्यू: १७ मार्च १९३७)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१५
रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार, पद्मभूषण (१९७१), रॅमन मॅगसेसे (१९८४), पद्मविभूषण (२००५) इत्यादि पुरस्कारांचे मानकरी
(जन्म: २४ आक्टोबर १९२१)
१९६८
बापूजी अणे
लोकनायक माधव श्रीहरी तथा 'बापूजी' अणे – शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्यसैनिक, मुत्सद्दी, आधुनिक संस्कृत कवी आणि राजकीय नेते. ३ ऱ्या लोकसभेतील (१९६२-१९६८) खासदार (नागपूर मतदारसंघ), बिहारचे राज्यपाल (१२ जानेवारी १९४८ - १४ जून १९५२). पद्मविभूषण (१९६८), (मरणोत्तर) साहित्य अकादमी पुरस्कार (१९७३). बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ज्या रस्त्यावर आहे त्याला अणे मार्ग असे नाव आहे.
(जन्म: २९ ऑगस्ट १८८०)
१९५४
मानवेंद्रनाथ रॉय – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक
(जन्म: २१ मार्च १८८७)
१८२३
एडवर्ड जेन्‍नर – देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर
(जन्म: १७ मे १७४९)
१७३०
कवी श्रीधर यांनी समाधि घेतली
(जन्म: ? ? ????)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2023-गुरुवार.
=========================================