मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-105-एपीजे अब्दुल कलाम

Started by Atul Kaviraje, January 26, 2023, 09:10:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-105
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "एपीजे अब्दुल कलाम"

     आजच्या या लेखात भारताचे राष्ट्रपति व 'मिसाईल मॅन' या नावाने ओळखले जाणारे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा मराठी निबंध पाहणार आहोत हा abdul kalam marathi essay आपल्याला शाळा शाळा कॉलेज मध्ये उपयुक्त राहील.

     डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अवुल पाकिर जैनुलाबदिन अब्दुल कलाम असे होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 ला रामेश्वरम मध्ये झाला होता. ते भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. आणि भारतात त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 2002 पासून तर 2007 पर्यंत होता. अब्दुल कलाम यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच ते आभ्यासात हुशार होते. त्यांनी आधी फिजिक्स विषयाचा अभ्यास केला आणि नंतर एरोस्पेस अभियांत्रिकी क्षेत्रातून शिक्षण पूर्ण केले.

     अब्दुल कलाम यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या करिअरमध्ये खूप मेहनत केली. त्यांनी डीआरडीओ आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) मध्ये महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या या महान कार्यामुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणून देखील संबोधले जाते. त्यांनी भारताची सैन्य क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले. 1998 साली त्यांनी भारतात यशस्वी अणु चाचणी घेतली.

     अब्दुल कलाम 2002 पर्यंत खूप लोकप्रिय झाले होते. त्यांची लोकप्रियता एवढी वाढली होती की 2002 साली त्यांना देशाचे राष्ट्रपती बनण्यासाठी निवडण्यात आले. ते स्वतंत्र भारताचे 11 वे राष्ट्रपती होते आणि या पदावर ते 2007 पर्यंत कार्यरत राहिले. राष्ट्रपतींच्या रूपात त्यांनी भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. ते एक लोकप्रिय राष्ट्रपतींच्या रूपात ओळखले जातात. लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखतो व त्यांच्यापासून प्रेरणा घेतो.

     27 जुलै 2015 रोजी 83 वर्षाच्या वयात अब्दुल कलाम यांचे निधन झाले. त्या वेळी ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलॉंग येथे लेक्चर देत होते अचानक आलेल्या हृदय रोगाने त्यांचा मृत्यू झाला. अब्दुल कलाम एक खरे देशभक्त होते. उच्च पदावर कार्यरत असतानाही ते अतिशय साधे जीवन जगत असत. म्हणूनच त्यांना आपल्या देशात नेहमी आठवण केले जाईल.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                    -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2023-गुरुवार.
=========================================