दुःखाने भरलेल्या जीवनाचे गीत-जीवन माझं भरलंय दुःखाने, जीवन माझं सरलंय दुःखानेच

Started by Atul Kaviraje, January 26, 2023, 09:37:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, दुःखाने भरलेल्या जीवनाचे (SAD SONG) कविता-गीत  ऐकवितो. "जब दर्द नहीं था सीने में, क्या ख़ाक मज़ा था जीने में"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही निशा-गुरुवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (जब दर्द नहीं था सीने में, क्या ख़ाक मज़ा था जीने में)
---------------------------------------------------------------

                "जीवन माझं भरलंय दुःखाने, जीवन माझं सरलंय दुःखानेच"
               ---------------------------------------------------

जीवन माझं भरलंय दुःखाने,
जीवन माझं सरलंय दुःखानेच !

जीवन माझं भरलंय दुःखाने,
जीवन माझं सरलंय दुःखानेच !
लोकहो, हसू नका माझ्या दुःखावर
लोकहो, उठू नका माझ्या आयुष्यावर,
     एकवार मज माफ करा तुम्ही,
     माझ्या अश्रूंना न्याय द्या तुम्ही.

एकवेळ असा येईल मित्रांनो
जेव्हा डोळ्यात अश्रूच नसतील
वाट पाहावी लागेल नयन झरण्याचे
निमित्त शोधावे लागेल तेव्हा पावसाचे,
     कोरड्याठाक डोळ्यात अश्रू येतीलच कोठून,
     दुःखेच येताहेत माझ्या नशिबी एकेक पाठून.

केव्हातरी दुःख फार दूर होते
माझ्या जवळ त्याचे सूर नव्हते
केव्हातरी मज दुःखाचा नव्हता आभासही
सुखात होता माझा चालला प्रवासही,
     सुखाने आज बाजी पलटलीय,
     दुःखाने आज बाजी मारलीय.

किनाऱ्यावर मी उभा होतो तेव्हा
बुडणाऱ्यांना मी पाहत होतो तेव्हा
मला त्याचे काही पडले नव्हते
मला फक्त माझेच पडले होते,
     आता मित्रांनो उलटलीय परिस्थिती,
     गटांगळ्या खाण्याची माझी झालीय स्थिती.

त्या प्रवाहात आज वाहत चाललोय
पाण्याबरोबर मी दुःखही पिऊ लागलोय
नाव माझी माझ्याबरोबरच बुडतेय
दूर किनारी गाव माझंI दिसतेIय,
     मित्रांनो, आता फार उशीर झालाय,
     माघारी फिरता किनाराच दूर गेलाय.

आपले होत होते तेव्हा परके
तेव्हाही काही नव्हते वाटले
स्वप्नांचा चक्काचूर होत होता जेव्हा
तेव्हाही नव्हते सुख आटले,
     पण आता कळकळीने जाणवतोय परिणाम,
     दुःखाचे अतिवच झालंय आज प्रमाण.

माझ्यासारखे प्रेम नाही केले कुणी
माझ्यासारखा विश्वास नाही ठेवला कुणी
आज त्याचं प्रेमाच्या ठिकऱ्या उडाल्यात
विश्वासाच्या रचलेल्या लगोऱ्या ढासळल्यात,
     आता विश्वास नाही कुणावर माझा,
     प्रेमात कुणीही नाही साथीदार माझा. 

आज तुम्हाला मी आवाज देतोय
हा दुःखित तुम्हाला ओरडून सांगतोय
माझ्यावर एक उपकार करा लोकहो
माझ्या गुन्ह्याला माफ करा लोकहो,
     मला जगण्याचा एक अधिकार द्या,
     या दुःखातून मला मुक्ती द्या.

जीवन माझं भरलंय दुःखाने,
जीवन माझं सरतंय दुःखानेच !
दुःखे जरी पुजलीत पाचवीला,
मीही तुमच्यासारखाच माणूस आहे.

लोकहो, हसू नका माझ्या दुःखावर
लोकहो, उठू नका माझ्या आयुष्यावर
तुमच्या मनात एक जागा हवी,
बस, सुखाची एक झलक हवी. 

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2023-गुरुवार.
=========================================