प्रेम कविता-गीत-होतो माझ्या मनाचा गुलाम, मी झालोय आता तुझाही गुलाम !

Started by Atul Kaviraje, January 26, 2023, 10:50:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेम कविता-गीत ऐकवितो. "दिल क्या करे जब किसी को, किसी से प्यार हो जाए"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही निशा-गुरुवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (दिल क्या करे जब किसी को, किसी से प्यार हो जाए)
---------------------------------------------------------------

                "होतो माझ्या मनाचा गुलाम, मी झालोय आता तुझाही गुलाम !"
               ------------------------------------------------------

होतो माझ्या मनाचा गुलाम,
मी झालोय आता तुझाही गुलाम !

होतो माझ्या मनाचा गुलाम,
मी झालोय आता तुझाही गुलाम !
पहा प्रेमाने मज काय दाखविले
चक्क तुझ्या मनाचा दास केले,
     राधिके, ही तुझी जादू खरी,
     कशी काय जमते तुला जादूगिरी ?

नाहीच कळलं केव्हा झालं प्रेम
नाही समजलं तेव्हाच झालं प्रेम
माझं मन माझ्या काबूत नव्हतं
ते तुझ्या कधीच आधीन होतं,
     राधिके, हा खेळ होता तुझ्या नजरेचा,
     खेळतं होतीस तू माझ्यासवे नजरबंदीचा.

पुष्कळ बाधा होत्या आपल्या प्रेमात
मनःस्थिती द्विधा त्या करून गेल्यात
तुझ्या हाती तेव्हा काही नव्हतं
माझ्या आवाक्यात थोडंही नव्हतं,
     तरीही प्रेम जिंकलं होतं आपलं,
     जगाच्या विरुद्ध जाऊन ते आपण जपलं.

तुझ्या चेहऱ्यावर असा नूर आहे
तुझ्या नजरेत प्रेमाचा सूर आहे
तुला पाहून प्रेमलाटा उसळत्या
माझ्या मनाच्या किनाऱ्यावर आदळत आहे,
     चेहऱ्यावरून नजर हटतच नाही,
     प्रेम मनात दाटतच राही.

तुझ्या प्रेमात मी सर्व काही विसरलोय
तुझ्या प्रेमात मी जगालाही विसरलोय
तुझी छबी मनात वसलीय
तुझी प्रतिमा मनात ठसलीय,
     राधिकेमय भासतंय सारं जग,
     प्रेममय झालंय सारं जग.

विश्वास नाही माझ्यावर राधिके
पाहू नकोस अविश्वासाने सारखे
हृदयात माझ्या डोकावून पहा
रक्ताला माझ्या पारखून पहा,
     तुझंच रूप आहे भरलेले,
     तुझंच नांव नसानसात मुरलेले.

प्रेमाची परीक्षा घेऊ नकोस माझ्या
आता कशाची साक्ष देऊ मी ?
मनातल्या भावना तुला समजण्या
आता कुठले गीत गाऊ मी ?
     अगं तुझाच आहे गुलाम मी,
     तुझाच आहे दास मी.

होतो माझ्या मनाचा गुलाम,
मी झालोय आता तुझाही गुलाम !

होतो माझ्या मनाचा गुलाम,
मी झालोय आता तुझाही गुलाम !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2023-गुरुवार.
=========================================