विरह कविता-गीत-काहीतरी दुःख हवीत आयुष्यात, जी करतात आयुष्याला बरबाद

Started by Atul Kaviraje, January 27, 2023, 06:03:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, विरह कविता-गीत ऐकवितो. "कुछ लोग मोहब्बत करके, हो जाते हैं बर्बाद"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही संध्या-शुक्रवार  आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (कुछ लोग मोहब्बत करके, हो जाते हैं बर्बाद)
--------------------------------------------------------

               "काहीतरी दुःख हवीत आयुष्यात, जी करतात आयुष्याला बरबाद"
              --------------------------------------------------------
         
काहीतरी दुःख हवीत आयुष्यात,
जी करतात आयुष्याला बरबाद !

काहीतरी दुःख हवीत आयुष्यात,
जी करतात आयुष्याला बरबाद !
जे तू केलंस प्रिये, दिल तोडलंस,
आजही विरहात तुला मी देतोय साद !

हा विरह जाचतोय मज प्रिये
माझा छळच करतोय जणू प्रिये
यापुढे तुला मी आठवेन तरी,
तिर मारलास तू हृदयी जहरी.

तू स्वतःचच हीत पाहिलंस
तू माझ्या प्रेमाला लाथाडलंस
स्वार्थ तुझ्या नसानसांत भरलाय,
माझ्या मजबुरीचा तू फायदा घेतलाय.

तुझ्या भोळ्या चेहऱ्यास मी फसलो
तुझ्या गोड बोलण्यास मी भुललो
सारं नाटकच होतं ते,
सारा खेळच होता तो.

एक दिवस म्हणाली होतीस लाडाने
मला तू कधी विसरशील का ?
आज तीच आलीय दुःख-स्थिती,
तू मला सोडलंसच का ?

विसरता म्हटलं नाही विसरता येतं
बेवफाई तुझी नाही विसरू देत
प्रेमाचा खेळ खेळायचा होता तुला,
खेळणंच बनवलंस तू मला.

तरीही मी गप्पच आहे
तुझ्या विरहात मी झुरत आहे
ठरवलंय मनाने एकटंच रहायच,
आता कुणावरही प्रेम नाही करायचं.

यापुढे मी नाही सहणार दुःख
तुला मनातून बादच केलय मी
आणि नाही बरबाद करायचंय आयुष्य,
आठवणीत नाही पहायचंय भविष्य.

प्रेमात खूप भोगलंय मी
विरहाने व्यथित झालोय मी
कधीच प्रेमात नाही पडणार मी,
जीवन वाया नाही घालवणार मी.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.01.2023-शुक्रवार.
=========================================