विरह कविता-गीत (SAD SONG)-जेव्हापासून तू गेलीस दूर, मी मदिरेस जवळ केलंय

Started by Atul Kaviraje, January 27, 2023, 06:33:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, विरह कविता-गीत (SAD SONG) ऐकवितो. "ये लाल रंग कब मुझे छोड़ेगा , मेरा ग़म, कब तलक़, मेरा दिल तोड़ेगा"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही संध्या-शुक्रवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(ये लाल रंग कब मुझे छोड़ेगा , मेरा ग़म, कब तलक़, मेरा दिल तोड़ेगा )
----------------------------------------------------------------------

                     "जेव्हापासून तू गेलीस दूर, मी मदिरेस जवळ केलंय"
                    ----------------------------------------------

जेव्हापासून तू गेलीस दूर,
मी मदिरेस जवळ केलंय !

जेव्हापासून तू गेलीस दूर,
मी मदिरेस जवळ केलंय !
दुःख जाळत गेलं मन माझं,
या लाल पाण्यास मी आपलंस केलंय !

आजही ओठावर तुझंच नाव आहे
सच्चाई तुझ्यात भरली आहे
बाकी सारI बनाव आहे,
लुच्चाईने दुनिया भरली आहे.

पण तुही कधी पाठ फिरवलीस
तुही कधीतरी साथ सोडलीस
तेव्हा या मदिरेने मज साथ केली,
आता ती माझ्या रक्तातच भिनली.

आता तू नाहीस तर ही दारू आहे
फक्त पिण्याची मी शपथ घेतली आहे
तुला काय कर्तव्य आहे माझ्याशी,
तुझ्याविना मी कसातरी जगणार आहे.

तुझी वाट पाहून मी दूर चाललोय
पावले नेतील तिथे मी चाललोय
इथे नाही पिण्यास अमृत ना विष,
या मदिरेसच मी सोबत घेऊन चाललोय.

आधी मी तिला सोडत नव्हतो
आता ती मला सोडत नाहीय
माझ्या दु:खावर आता एकच औषध,
मला मदिरेची कायमचीच साथ हवीय.

तू आता नाहीस स्मरणात माझ्या
तुला केव्हाच विसरलोय मी आता
आता ही मदीराच माझं सर्वस्व आहे,
आता ही मदीराच माझी प्रेयसी आहे.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.01.2023-शुक्रवार.
=========================================