मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-193

Started by Atul Kaviraje, January 27, 2023, 09:39:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 मला आवडलेल्या चारोळ्या
                                    चारोळी क्रमांक-193
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं-चारोळीकार  अजून  एक  प्रेमाची  चारोळी  आपणास  सांगत  आहे , पण  आता  ती  विरहाच्या , प्रेम-भंगाच्या  स्वरूपात . त्याच्या  चारोळीतील  प्रेमी  आपल्या  प्रेमिकेस  म्हणतोय , की  केव्हातरी  मी  तुझ्यावर  जीवापाड  प्रेम  केले  होते . कित्येकदा  तर , तुझ्या  आठवणींनी  मला  सावरलेही  होते . पण  आता  परिस्थिती  बदलली  आहे , प्रिये . तू  आज  माझ्याकडे  ढुंकून  देखील  पाहत  नाहीस . माझी  ती  एक  मजबुरी  होती , की  ज्याला  तू  आजमावले  होतेस  . जी  काही  प्रेमभंगाची  जखम  तू  मला  दिली  आहेस , मग  तुझ्या  आठवणी  जपून  माझे  काय  बरे  भले  होणार  आहे . माझ्या  या  जखमांवर  तुझ्या  आठवणींचे  मलम  मला  नको . तुझ्या  या  आठवणी  देखील  मी  पुसून  टाकणार  आहे .

======================
💝 *तुझ्या प्रेमाने रडवलं आहे खुप..
तुझ्या आठवणीने मला सावरल आहे खुप..
मी तुझ्यावर जिवा-पाडप्रेम करत होतो..
माझ्या या मजबुरीला तू आजमावलं आहे खुप..
दिली आहेसच तू मला
प्रेम भंगाची जखम, मग कशाला हवे आहे
तुझ्या आठवणींचे मलम..💘
======================

--नवं-चारोळीकार
----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.01.2023-शुक्रवार.
=========================================