मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-106-डॉ.अब्दुल कलाम

Started by Atul Kaviraje, January 27, 2023, 09:53:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                   निबंध क्रमांक-106
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "डॉ.अब्दुल कलाम"

     डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 ला तमिळनाडूमधील रामेश्वरम मध्ये एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे वडील जैनुल्लाब्दीन नाविक व मत्स्य व्यवसाय करत असत‌. त्यांच्या आईचे नाव असिम्मा होते. अब्दुल कलाम यांना तीन मोठे भाऊ आणि एक बहिण होती.

     अब्दुल कलाम यांचे पूर्वज धनिक व्यापारी होते. परंतु 1920 च्या दशकात त्यांना व्यापारात भरपूर नुकसान झाले व जेव्हा अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. तेव्हा त्यांना अतिशय गरिबीत दिवस काढावे लागले. लहान असताना शिक्षणासाठी ते संघर्ष करू लागले, घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटू लागले व मिळालेले पैसे आपल्या शिक्षणासाठी लावू लागले.

     अब्दुल कलाम त्यांच्या वडिलांकडे इमानदारी, शिस्त व उदारता शिकले. त्यांचे प्रारंभिक शिक्षण रामेश्वरम् मधील एलिमेंट स्कूलमध्ये झाले. 1950 मध्ये त्यांनी BSC ची परीक्षा St. Joseph's College मधून पूर्ण केली. यानंतर 1954 ते 57 मध्ये त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून एरोनॉटिकल इंजिनीरिंग मध्ये डिप्लोमा केला.

     1958 मध्ये अब्दुल कलाम यांनी D.T.D. and P. मधील तंत्रज्ञान केंद्रात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्य करणे सुरू केले. त्यांनी DRDO चे लहान होवर्क्राफ्ट डिझाईन करून आपल्या करिअरची सुरुवात केली. सुरुवाती दिवसात त्यांनी भारतीय सेनेसाठी एक हेलिकॉप्टर तयार केले. त्यांनी इसरो मध्ये पहिला उपग्रह प्रक्षेपण यान आणि ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान बनविण्याच्या कार्यात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या या योगदानामुळे त्यांना भारताचे मिसाइल मॅन म्हणून संबोधले जाऊ लागले.

     10 जून 2002 ला एनडीए सरकारने राष्ट्रपतिपदासाठी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव सुचवले. राष्ट्रपती निवडणुकीत त्यांना 922,884 मत मिळाले व लक्ष्मी सहगल यांना हरवून ते निवडणूक जिंकले. अब्दुल कलाम यांनी 15 जुलाई 2002 ते 25 जुलै 2007 पर्यंत भारताचे राष्ट्रपती म्हणून कार्य केले. ते राष्ट्रपती भवनात राहणारे पहिले अविवाहित शास्त्रज्ञ होते.

     27 जुलै 2015 ला अब्दुल कलाम एका कार्यक्रमासाठी शिलाँग गेले होते. या दरम्यान त्यांची तब्येत खराब झाली. तेथील एका कॉलेजमध्ये मुलांना ते लेक्चर देत आसतांना ते अचानक खाली पडले. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु काही तासातच त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. 

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.01.2023-शुक्रवार.
=========================================