प्रेम कविता-गीत-तुझ्या स्वप्नांनी उधळलीत फुले, उंच झुल्यावर माझं मन झुले

Started by Atul Kaviraje, January 27, 2023, 10:37:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेम कविता-गीत ऐकवितो. "देखा एक ख़्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाहों में हैं गुल खिले हुए"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही निशा-शुक्रवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(देखा एक ख़्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाहों में हैं गुल खिले हुए)
----------------------------------------------------------------------

                  "तुझ्या स्वप्नांनी उधळलीत फुले, उंच झुल्यावर माझं मन झुले"
                 -----------------------------------------------------

तुझ्या स्वप्नांनी उधळलीत फुले,
उंच झुल्यावर माझं मन झुले.

तुझ्या स्वप्नांनी उधळलीत फुले,
उंच झुल्यावर माझं मन झुले
तुला पाहून होतंय मन आनंदी,
तुला मिळवून माझी भावना उचंबळे.

तू येता मला एक एहसास होतो
जणू वारा तुझा सुगंध घेऊन येतो
तुझ्या प्रीतीत मी न्हाऊन निघतो,
तुझं सान्निध्य गारवा घेऊन येतो.

तुझ्या आवाजात एक कशिश आहे
तुझ्या आवाजात एक जादू आहे
जो मनाला नेहमीच खिळवून ठेवतो,
जो मनाला तुझ्यात बांधून ठेवतो.

तुझ्या प्रेमाचा ढंग अनोखा आहे
प्रेम-रंग चहूकडे सारखा आहे
तुझी धडधड गाणे गात आहे,
तेच तर प्रेमाचे तराणे आहे.

निःशब्द तुझे प्रेम काही सांगत आहे
थरथरते तुझे ओठ काही वदत आहे
त्या ओठांना हलकेच तू दाबता,
लाजेची एक सौंदर्य-पुतळी तू भासत आहे.

माझे मन तुला आलंय शरण
माझ्या प्रेमाला तूच होतीस कारण
ये सखे, माझ्या बाहूत ये,
वेळ नको दवडूस, विनाकारण.

जिथे पाहावी तिथे तूच आहेस
नयनांत माझ्या तुझीच छबी आहे
तुझ्या पावलांनी अंधार उजळलाय,
जणू शेकडो दिव्यांचा उजेड पडलाय.

अशी प्रियतमा, तू माझी आहेस
अशी तिलोत्तमा, तू फक्त माझीच आहेस
तुला मिळवून मी धन्य आहे,
तुझ्यामुळेच आज माझे जीवन आहे.

तुझ्या स्वप्नांनी उधळलीत फुले,
उंच झुल्यावर माझं मन झुले.

तुझ्या स्वप्नांनी उधळलीत फुले,
उंच झुल्यावर माझं मन झुले.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.01.2023-शुक्रवार.
=========================================