जीवन-प्रवासावर कविता-गीत-जीवन यात्रा अशीच सुरु असते, जीवन यात्रा अशीच सुरु राहते

Started by Atul Kaviraje, January 28, 2023, 05:20:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, जीवन-प्रवासावर कविता-गीत ऐकवितो. "ज़िन्दगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही शनिवार-संध्या आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(ज़िन्दगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते)
------------------------------------------------------------------------

             "जीवन यात्रा अशीच सुरु असते, जीवन यात्रा अशीच सुरु राहते !"
            ---------------------------------------------------------

जीवन यात्रा अशीच सुरु असते,
जीवन यात्रा अशीच सुरु राहते !

जीवन यात्रा अशीच सुरु असते,
जीवन यात्रा अशीच सुरु राहते !
एक लक्षात ठेव तू यात्रिका,
चालण्याशिवाय तुला गत्यंतर नसते.

जीवन यात्रा अशीच सुरु असते,
जीवन यात्रा अशीच सुरु राहते !
तू फक्त चालत राहा, पांथस्थI,
ही वाटच तुझी कर्मभूमी असते.

जीवन यात्रा अशीच सुरु असते,
जीवन यात्रा अशीच सुरु राहते !
तुला फक्त चालायचंय, पथिकI,
चालणं हेच तुझ्या प्राक्तनात असते.

वाटेत फुललेली फुले तुला दिसतील
वाटेत कितीतरी लोक तुला थांबवतील
पण त्या फुलांचा सुगंध घेणं टाळ,
त्या लोकांचा आग्रह तू टाळ.

बहार येते, बहार जाते
पानगळ येते, पानगळ जाते
ऋतुचक्र हे सुरूच असते,
निसर्गाचे नियमित विधान असते.

मग कितीही तू थांबशील
गेलेला नाही येत परतुनी
मग कितीही तू विचारशील,
एकदा गेला की गेला निघुनी.

तू जे पाहत आहेस, मुशाफिरा
तो फक्त भास आहे
तुला जे दिसत आहे,
तो फक्त नजरेचा आभास आहे.

शंकेखोर नजरेने तू पाहणे सोड
शंकेला तुझ्या मनात स्थान देऊ नकोस
ही शंकाच शेवटी शंकासुर होईल,
आपलाच शेवटी तुला परका होईल.

तुझ्या वर्तनाने तू सर्वांना गमावशील
तुझ्या वागण्याने तू एकटा राहशील
नंतर आठवण काढून काय उपयोग ?
नंतर पश्चIत्ताप करून काय उपयोग ?

त्यांना कितीही बोलावले नाही येणार
त्यांना कितीही आठवले नाही विसरणार
गेला तो दिवस भूतकाळ झाला,
गेला तो दिवस नजरेआड झाला.

सकाळ जाते, दुपार येते
संध्याकाळ जाते, रात्र होते
गेलेला समय येत नाही परत,
गेलेली माणसे येत नाहीत परत.

वेळ धावत आहे, वेळ पळत आहे
काळ सरत आहे, काळ अविरत आहे
पाहता पाहता हातून निसटून जातो,
पकडू पाहता वाकुल्या दाखवतो. 

माणूस कुठेतरी थिटा पडतो
त्याचा प्रयत्न छोटा पडतो
काळाला थांबवणे नाही त्याचे हाती,
काळाबरोबर धावतI पावले त्याची थकती.   

दिवस सरले, रातीही सरल्या
दशके गेली, शतकेही गुजरली
जीवन यात्रा अशीच सुरु राहिली,
जीवन यात्रा कुणासाठीही नाही थांबली.

म्हणून म्हणतो हे पथिकI
तू थांबू नकोस, चालतच राहा
झाले गेले काळा-पडद्याआड गेले,
विसरून सारे, पथ आक्रमित राहा.

जीवन यात्रा अशीच सुरु असते,
जीवन यात्रा अशीच सुरु राहते !

जीवन यात्रा अशीच सुरु असते,
जीवन यात्रा अशीच सुरु राहते !
एक लक्षात ठेव तू यात्रिका,
चालण्याशिवाय तुला गत्यंतर नसते.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.01.2023-शनिवार.
=========================================