मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-194

Started by Atul Kaviraje, January 28, 2023, 09:35:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                मला आवडलेल्या चारोळ्या
                                  चारोळी क्रमांक-194
                              -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं-चारोळीकार  पुन्हा  एकदा  या  चारोळीत  प्रेम  आणि  त्याच्या  आठवणीत  हरवून  गेला  आहे . तो  म्हणतोय , या  आठवणी  अश्याच  असतात . या  आठवणींत  वेडं  मन  असंच  एकटं  असलं  की  हरवून  जातं . आणि  त्यातच  पाऊस  सुरु  झाला  की , या  अश्रूंना  लपवायला  या  वेड्या  मनाला  सोपं  पडतं . लपलेलं  प्रेम  आणि  न  विसरता येणाऱ्या आठवणी  यांची  मग  एक  कहाणी  सुरु  होते . आता  परिस्थिती  बदललेली  असते . वातावरण  तेच  पावसाचं  असतं , ढगाळलेलं असतं , पण  ते  बरसत  नाही . पाऊस  पडतं  नाही . पाऊस  कोसळत  नाही . पण  आता  फक्त  वाहत  राहतात , त्याच  वेड्या  आठवणींच्या  वेड्या  लहरी , बेधुंदपणे .

==================
💝 "आठवणीत कधी जेव्हा मन
वेड हरवते..
कोसळणाऱ्या पावसात मग
आसवांना लपवते
लपलेल प्रेम आणि न
विसरलेल्या आठवणी
ढगाळलेल तेच वातावर पण
कोसळत नाहीत..
आता पुन्हा त्याच टपोऱ्या
थेंबाच्या सरी
वाहत राहता आता फक्त
त्याच वेड्या आठवणीच्या लहरी..""💘
==================

--नवं-चारोळीकार
----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.01.2023-शनिवार.
=========================================