प्रेम कविता-गीत-माझ्या आयुष्याची तू ठेव आहेस, माझ्या जीवनातले तू प्रेम आहेस !

Started by Atul Kaviraje, January 28, 2023, 10:27:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेम कविता-गीत ऐकवितो. "ओ मेरे दिल के चैन, चैन आये मेरे दिल को दुआ कीजिये"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही निशा-शनिवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(ओ मेरे दिल के चैन, चैन आये मेरे दिल को दुआ कीजिये)
------------------------------------------------------------------

            "माझ्या आयुष्याची तू ठेव आहेस, माझ्या जीवनातले तू प्रेम आहेस !"
           -----------------------------------------------------------

माझ्या आयुष्याची तू ठेव आहेस,
माझ्या जीवनातले तू प्रेम आहेस !

माझ्या आयुष्याची तू ठेव आहेस,
माझ्या जीवनातले तू प्रेम आहेस !
जेव्हापासून आलीस माझ्या आयुष्यात,
माझे सर्व कुशल क्षेम आहे.

घाबरू नकोस तू सखे अशी
उदास होऊ नकोस तू सखी
अगं प्रेमाची ही तर पहिलीच पायरी,
अजून खूप व्हायचीय आपली तयारी.

मला तू आवडली आहेस, प्रिये
मला तू प्रिय आहेस, प्रिये
तूच जर असं वागलीस तर,
माझं काय होईल बरं, प्रिये ?

माझी मंजिल तूच आहेस
माझ्या सर्व आशा तूच आहेस
मनाला शांती मिळणारे एकचं ठिकाण,
तुझ्या पायांशी माझा स्वर्ग आहे.

तुझ्या झुकलेल्या पापण्यात सौंदर्य आहे
तुझ्या दबलेल्या ओठात माधुर्य आहे
माझं दिल तुझं झालंय प्रिये,
माझं आता कुठे लक्ष लागणार आहे ?

मला तुझ्याशिवाय कुणीच दिसत नाहीय
मनाला तुझ्याशिवाय चैनच मिळत नाहीय
माझं मन तुझ्याच ताब्यात आहे,
माझं मन आता माझ्या आटोक्यात नाहीय.

तसं तर मी एकटा राहू शकेन
तसं तर मी एकटा जगूही शकेन
पण तुझ्याशिवाय जीवनाला रंग नाही,
तुझ्याशिवाय आयुष्याला ढंग नाही.

तुझा हात माझ्या हाती दे, प्रिये
पहा मी कसा जगाशीही लढेन
माझ्या प्रेमाला होकार दे, प्रिये,
पहा तुला मी आयुष्यभर जपेन.

ईश्वराकडे मी तुलाच मागितलंय
जेव्हापासून मी तुला पाहिलंय
आता नकार देऊ नकोस,
तेव्हापासून मी तुला प्रेमात वाहिलंय.

बस मला तूच हवी आहेस
मला फक्त तुझ प्रेमच हवंय
आयुष्यभराचा आराम मला दे तू,
तुझ्या प्रेमात मला सारं दे तू.

माझ्या आयुष्याची तू ठेव आहेस,
माझ्या जीवनातले तू प्रेम आहेस !

माझ्या आयुष्याची तू ठेव आहेस,
माझ्या जीवनातले तू प्रेम आहेस !
जेव्हापासून आलीस माझ्या आयुष्यात,
माझे सर्व कुशल क्षेम आहे.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.01.2023-शनिवार.
=========================================