(SAD-SONG)-कुणीतरी हवंय आधार द्यायला, कुणीतरी हवंय माझं म्हणायला

Started by Atul Kaviraje, January 29, 2023, 12:19:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, (SAD-SONG) ऐकवितो. "कोई होता जिसको अपना, हम अपना कह लेते यारों"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही रविवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(कोई होता जिसको अपना, हम अपना कह लेते यारों)
--------------------------------------------------------------

               "कुणीतरी हवंय आधार द्यायला, कुणीतरी हवंय माझं म्हणायला"
              ------------------------------------------------------

कुणीतरी हवंय आधार द्यायला,
कुणीतरी हवंय माझं म्हणायला !

कुणीतरी हवंय आधार द्यायला,
कुणीतरी हवंय माझं म्हणायला !
कुणीतरी हवंय जवळच असं,
कुणीतरी हवंय आपलंस असं !

कुणीतरी हवंय काळजी घ्यायला   
कुणीतरी हवंय आशा दाखवायला
कुणीतरी हवंय मित्र म्हणायला,
कुणीतरी हवंय मैत्री जपायला.

कुणी माझा होईल का ?
कुणी मला आपला म्हणेल का ?
जवळ नाही पण दुरुनच सही,
कुणी माझा असेल का ?

वाट पाहून माझे डोळेही शिणलेत
आता अश्रूंनीही वाहणे थांबवलेय
आता स्वप्नांनीही येणे बंद केलेय,
मी माझ्याच दुःखात कैद झालोय.

कुणीतरी माझं दुःख घेईल का ?
मला कुणी जवळ घेईल का ?
कुणी माझे अश्रू पुसून,
माझे दुःख विचारील का ?

कुणीतरी केले होते वादे
नव्हते त्याचे नेक इरादे
वादे केले आणि विसरून गेले,
या आठवणीतच माझे जीवन गेले.

आता एकटं एकटं वाटतंय
रात्रही सारी खायला ऊठतेय
कुणी नाही दिलासा द्यायला,
कुणी नाही सहारा द्यायला.

वाटतंय जगणं हे जगणं नाही
कुणालाही माझी कणवच नाही
एकटेपणाच दुःख मी आजही सहतोय,
कुणीतरी येण्याची वाट पाहतोय.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.01.2023-रविवार.
=========================================