प्रेम कविता-गीत-माझे अश्रूच तुला सांगताहेत, माझं तुझ्यावरचं प्रेम दाखवताहेत !

Started by Atul Kaviraje, January 29, 2023, 05:01:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेम कविता-गीत ऐकवितो. "कभी पलकों पे आंसू है, कभी लब पे शिकायत है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही सांज-रविवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(कभी पलकों पे आंसू है, कभी लब पे शिकायत है)
------------------------------------------------------------

              "माझे अश्रूच तुला सांगताहेत, माझं तुझ्यावरचं प्रेम दाखवताहेत !"
             --------------------------------------------------------

माझे अश्रूच तुला सांगताहेत,
माझं तुझ्यावरचं प्रेम दाखवताहेत !

माझे अश्रूच तुला सांगताहेत,
माझं तुझ्यावरचं प्रेम दाखवताहेत !
हे अश्रू वाया नाहीत, प्रियकरा,
तू माझाच, असं ते सांगताहेत !

कधी ओठावर तक्रार आहे
कधी गालांवर रुसवा आहे
हे सारं मुद्दामच आहे, प्रिया,
मला तुझं प्रेमच मिळवायचंय !

मी जीवनावर प्रेम करायला शिकलेय
मी तुझ्यावर जीव ओवाळायला शिकलेय
हे सारं तुझ्यासाठीच आहे, साजणा,
मी स्वप्नात फक्त तुलाच पाहिलेय.

जो येतो तो जातोही
या दुनियेत कुणी नाही टिकतही
पण माझं प्रेम तसं नाहीय,
ते चिरकाल शाश्वत राही.

इथले सारेच प्रवासी आहेत
इथले सारेच मुशाफ़िर आहेत
मी तुला, तू मला निवडलंय,
आपण दोघेही हमसफर आहोत.

आजवर अंधारातच होते मी
आजवर उजेडाला मुकले मी
माझ्या जीवनी तू प्रकाश घेऊन आलास,
माझ्या आयुष्याच्या ज्योती तू उजळल्यास.

जीवनाला मी फार जवळून पाहिलंय
आयुष्याला मी चांगलंच पारखलंय
याच आयुष्यात तू भेटलास मला,
मी तुला चांगलंच ओळखलंय.

या आयुष्यात तू मला मिळालास
या जीवनात तू मला भेटलास
प्रेम काय ते मला समजलंय,
तुझ्या प्रेमाने मला सर्वकाही दिलंय.

तुला प्रेमात बांधून ठेवलंय, राजा
मी तुला नाही सोडणार, राजसा
मला सोडायचा विचारही करू नकोस,
संसार आपला सुरु झालाय आतासा. 

केव्हातरी परका होतास तू मला
केव्हातरी पारखा होतास तू मला
तुझी चाहूल मला लागली होती,
तेव्हापासून ओढ तुझी लागली होती.

माझ्या विराण आयुष्यात तू आलास
एकटीच होते मी, तू आपलं म्हणालास
कृतार्थ झाले मी प्रियकरा,
जेव्हा तू माझा हात हाती घेतलास.

ही घडी अशीच राहू दे
तुझा हात माझ्या हाती राहू दे
मरणा, थांब जरा घटकाभर,
माझ्या सजणाला माझी साथ लाभू दे.

आनंदाश्रू माझ्या गाली ओघळताहेत
प्रेमाने ते तुला पाहताहेत
साजणा, तू असाच राहा आयुष्यभर,
निःशब्द ओठ तुला सांगताहेत.

माझे अश्रूच तुला सांगताहेत,
माझं तुझ्यावरचं प्रेम दाखवताहेत !

माझे अश्रूच तुला सांगताहेत,
माझं तुझ्यावरचं प्रेम दाखवताहेत !
हे अश्रू वाया नाहीत, प्रियकरा,
तू माझाच, असं ते सांगताहेत !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.01.2023-रविवार.
=========================================