जीवन-प्रवास कविता-गीत-थकू नकोस, चालत राहा, विजयपथ तुला दिसत आहे पहा !

Started by Atul Kaviraje, January 29, 2023, 10:10:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, जीवन-प्रवास कविता-गीत ऐकवितो. "रुक जाना नहीं तू कहीं हार के, काँटों पे चलके मिलेंगे साये बहार के"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही निशा-रविवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(रुक जाना नहीं तू कहीं हार के, काँटों पे चलके मिलेंगे साये बहार के)
------------------------------------------------------------------------

                "थकू नकोस, चालत राहा, विजयपथ तुला दिसत आहे पहा !"
               -----------------------------------------------------

थकू नकोस, चालत राहा,
विजयपथ तुला दिसत आहे पहा !

थकू नकोस, चालत राहा,
विजयपथ तुला दिसत आहे पहा !
हरू नकोस, हताश होऊन नकोस,
सत्याचा मार्ग तुझ्या जवळ येतोय पहा !

चालता काटेच अधिक लागतील
पाय भेगाळतील, रक्तबंबाळ होतील
केव्हातरी बहार नक्कीच येईल, पथिकI,
तेव्हा फुलेच तुला पायघडी घालतील.

सूर्यही तुला पाहून थांबला आहे
तुला तो दिशा दाखवीत आहे
रात्र पडेल, अंधार होईल,
तेव्हा चंद्रही तुझ्या मदतीस येईल.

बस तुझ्या मस्तीत तू चालत राहा
चालताना पावलांना गोंजारत राहा
कारण तेच तुझी साथ करणार आहेत,
तेच तुला मंजिल दाखवणार आहेत.

तू दिवसाला रात्र कर
तू रात्रीला दिवस कर
मग संध्याकाळ तुझीच आहे,
मग तुझी पहाट उगवती आहे.

तुझे सवंगडी तुझ्या साथीला नाहीत
तुझा काफिला खूप पुढे गेला आहे
ही तुझी परीक्षाच आहे, मुशाफिरा,
ही तुझी सत्त्व-परीक्षाच आहे, पांथस्था.

तुझ्या मनगटात अजुनी जोर आहे
तुझ्या मनाची ताकद फार आहे
तुझ्या पावलांना रस्त्याची ओढ आहे,
पहा, मंजिल तुझ्या दृष्टीक्षेपात आहे.

अडथळे येतील अनेक मार्गात
खाचखळगे अनेक असतील रस्त्यात
कुणी थांबवले तरी थांबू नकोस,
तुझी मंजिल आहे तुला बोलावत.

तुझ्या डोळ्यांत ते स्वप्न दिसतंय
तुझ्या डोळ्यांत ती चमक दिसतेय
काहीतरी मिळवायचं तुला निश्चितच,
काहीतरी प्राप्त करायचंय तुला खचितच.

एक दिवस असा उगवेल मग
विजय पताका तुझ्या मार्गावर उभारेल जग
पहा, तुझा विजय तू मिळविलास,
पहा, शेवटी तूच आहेस जिंकलास.

थकू नकोस, चालत राहा,
विजयपथ तुला दिसत आहे पहा !

थकू नकोस, चालत राहा,
विजयपथ तुला दिसत आहे पहा !
हरू नकोस, हताश होऊन नकोस,
सत्याचा मार्ग तुझ्या जवळ येतोय पहा !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.01.2023-रविवार.
=========================================